नवी दिल्ली : दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात होता होता टळला. टेकऑफ घेतल्यानंतर लगेचच विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे वैमानिकाला समजले. यावेळी प्रसंगावधान राखत त्वरित विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत आणले. यामुळे विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
एअर इंडियाच्या AI2913 या विमानाने टेकऑफ केले आणि काही वेळातच वैमानिकाला कॉकपिटमध्ये उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचा इशारा मिळाला. त्यानंतर, वैमानिकाने त्वरित कार्यवाही करत इंजिन बंद केले आणि विमान पुन्हा दिल्लीला सुरक्षितपणे उतरवले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तपास पूर्ण होईपर्यंत हे विमान उड्डाण करणार नाही, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. प्रवाशांसाठी तातडीने दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली असून, ते लवकरच इंदूरला रवाना होतील.
वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
विमानात आग लागल्याचा इशारा मिळताच प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वैमानिकाने अत्यंत शांतपणे आणि कुशलतेने परिस्थिती हाताळली. त्याने योग्य ती खबरदारी घेऊन इंजिन बंद केले आणि विमान पूर्णपणे नियंत्रणात ठेवून दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. वैमानिकाच्या या कामगिरीमुळे प्रवाशांचा जीव वाचला.
एअर इंडियाच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना वाढल्या
एअर इंडियाच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. नुकतेच, १८ ऑगस्ट रोजी कोचीहून दिल्लीला जाणारे विमान उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाडामुळे थांबवावे लागले होते. त्याआधी १६ ऑगस्ट रोजी मिलानहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान ऐनवेळी रद्द करण्यात आले. एअर इंडियाच्या विमानात वारंवार असे बिघाड होत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
हिंगोलीतील धरणांतून पाण्याचा विसर्ग, तर मांजरा, गेरू माटरगाव धरणं तुडुंब
हिंगोली : महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील नद्या आणि धरणं ओसंडून वाहत आहेत. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तिन्ही धरणांतून पाण्याचा...
Read moreDetails