अकोला : नागरिकांचा मागास प्रवर्ग ( ओ. बी. सी) यांना भारतीय राज्यघटनेचे कलम ३४० अन्वये मिळालेले आरक्षण आबाधित रहावे, तसेच मागास प्रवर्गातील (ओ.बी.सी.) जात निहाय जनगणना करण्यात यावी यासाठी ओबीसी महासंघा महाराष्ट्र प्रदेश यांचे द्वारा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व मुख्यमंत्र्यांच्या नावे, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
तसेच मराठा समाजाला वेगळे स्वतंत्र आरक्षण दिल्यास त्यास ओ.बी.सी. महासंघ महाराष्ट्र प्रदेश यांचा विरोध राहणार नाही. मराठा आरक्षणाचे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट हे वेगळे ठेवण्यात यावे. अशी विनंती देखील या निवेदनात करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी या मोर्चात उपस्थीत राहून आलेल्या समुदायाला मार्गदर्शन केले.
यावेळी, बालमुकुंद भिरड( अध्यक्ष, ओबीसी महासंघ), ॲड. संतोष रहाटे, गोपाल राऊत, प्रमोद देंडवे( जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), सुभाष सातव, अनिल शिंदे, मनोहर पंजवानी, संतोष सरोदे, डॉ. संतोष हुशे, गजानन बोराडे, राजेश जावरकर, रामदास गाडेकर, शंकरराव गिऱ्हे, दिलीप कंकर, सुभाष दातकर, गजानन धामणकर, सुनील जाधव, गजानन वाघमारे, दिलीप पुसदकर, गणेश वडतकार, डॉ. किशोर ढोणे, स्वप्नील चवरे, दिलीप चवरे, जनार्दन सहारे, दीपक श्रीनिवास, हभप. किरण बोपटे महाराज, राजेश आंभोरे, भगवान थिटे, गोपाल चव्हाण, माणिकराव वणवे, मखराम राठोड, संतोष साळुंखे, डॉ. प्रकाश दाते, मनिष रूले, गुणवंत वाकरे, डॉ. गजानन करे, राम यवतकर, गोरसिंग राठोड, संजय वाडकर, प्रदिप मांगुळकर आदी मान्यवर उपस्थित होते