मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या बद्दल खोट्या बातम्या पेरणाऱ्या आणि अपप्रचार करणाऱ्या विकाऊ पत्रकारांविरोधात वंचित बहुजन आघाडी मानहानीचे फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी करत आहे.
नाव न घेण्याच्या अटीवर एका सूत्राने प्रबुद्ध भारतला सांगितले आहे की, वंचित बहुजन आघाडी यापुढे पत्रकारांकडून होणारा अपप्रचार सहन करणार नाही. वंचित बहुजन आघाडीची लिगल टीम आणि कार्यकर्ते अप्रप्रचार करणाऱ्या अशा विकाऊ पत्रकार आणि मीडिया हाऊसेस विरोधात विविध जिल्हा न्यायालयांमध्ये मानहानीचे खटले दाखल करण्याची तयारी करत आहेत. वंचित बहुजन आघाडीला देणगी देणाऱ्या व्यक्तींकडूनही अशा प्रकारे गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत.
एका पत्रकाराने वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात खोट्या बातम्या पेरल्याच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड होत आहे. वंचित बहुजन आघाडीने त्या पत्रकाराला आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. मात्र, आरोप सिद्ध करण्याचे सोडून ते पत्रकार उलट सुलट वक्तव्य करण्यात गुंतलेले आहेत.