मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. भारतीय स्टेट बँक (SBI) चे तब्बल २,९२९ कोटी रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपावरून आता सक्तवसुली संचालनालयाने (ED) त्यांच्या आणि त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीच सेबीने त्यांची येस बँकेतील गुंतवणुकीची चौकशी बंद करण्याची मागणी फेटाळून लावली होती.
हे नवीन प्रकरण केंद्रीय तपास संस्था (CBI) ने २१ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित आहे. या एफआयआरनंतर २३ ऑगस्ट रोजी सीबीआयने त्यांच्या मुंबईतील कार्यालय आणि निवासस्थानी छापेही टाकले होते.
आरोपांचे अनिल अंबानींकडून खंडन
या प्रकरणावर अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी करून सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एसबीआयने सुमारे १० वर्षांपूर्वीच्या प्रकरणांवर ही तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर, ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी अनिल अंबानी हे रिलायन्स कम्युनिकेशनचे (RCom) गैर-कार्यकारी संचालक होते आणि कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनात त्यांचा थेट सहभाग नव्हता, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. सीबीआयच्या कारवाईनंतर आता ईडीनेही या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून तपास सुरू केला आहे.
बँक कर्जांची सखोल चौकशी
ईडीने आतापर्यंत अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्यांच्या कथित बँक फसवणुकीतील भूमिकेची तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी केली आहे. १८ ऑगस्टच्या एका मीडिया रिपोर्टनुसार, ईडीने १७,००० कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान, ईडीने २० हून अधिक खाजगी आणि सार्वजनिक बँकांना पत्र लिहून रिलायन्स ग्रुपला दिलेल्या कर्जाची आणि त्यांच्या क्रेडिट तपासणीची माहिती मागवली आहे.
अनिल अंबानींच्या निकटवर्तीयाची चौकशी
याच प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, ईडीने मंगळवारी अनिल अंबानींचे माजी निकटवर्तीय अमिताभ झुनझुनवाला यांचीही चौकशी केली. याआधीही ते तपासणीदरम्यान ईडीसमोर हजर झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयच्या मुंबई शाखेच्या डीजीएम ज्योती कुमार यांनी १८ ऑगस्ट रोजी ईडीकडे तक्रार दाखल केल्यानंतर या बँक फसवणुकीचा खुलासा झाला. ऑक्टोबर २०२० मध्ये एका फॉरेन्सिक ऑडिटरच्या अहवालातून हे प्रकरण समोर आले होते, असे ज्योती कुमार यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे लातूर आणि उस्मानाबादमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन
लातूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन...
Read moreDetails