Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नेपाळमधील अस्थिरता : दक्षिण आशियात अमेरिकेचा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न – प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
September 10, 2025
in बातमी
0
नेपाळमधील अस्थिरता : दक्षिण आशियात अमेरिकेचा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न - प्रकाश आंबेडकर

नेपाळमधील अस्थिरता : दक्षिण आशियात अमेरिकेचा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न - प्रकाश आंबेडकर

       

नवी दिल्ली : दक्षिण आशियात अमेरिकेचा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. भारताचे शेजारी देश असलेल्या बांगलादेश आणि नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटामागे अमेरिकेचा अदृश्य हात असल्याचा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.

आपल्या अधिकृत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारतीय उपखंडातील भू-राजकीय परिस्थिती नव्याने घडवण्याचा हा अमेरिकेचा सुनियोजित प्रयत्न आहे.
‎
‎ बांगलादेश, नेपाळ या दोन्ही देशांतील आंदोलने जरी भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि लोकशाहीचा ऱ्हास यांसारख्या स्थानिक समस्यांमुळे सुरू झाली असली तरी, या आंदोलनांचा फायदा घेऊन मोठे राजकीय संकट निर्माण करण्यात अमेरिकेची भूमिका पूर्णपणे नाकारता येणार नाही.
‎
‎दक्षिण आशियातील बदलती समीकरणे –
‎
‎ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेने पाकिस्तानमधील चीनचा प्रभाव आधीच कमी केला आहे. आता आपण बांगलादेश आणि नेपाळमध्ये भारत समर्थक आणि चीन समर्थक सरकारे कोसळताना पाहत आहोत.
‎
‎बांगलादेश : भारताच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकारला पायउतार व्हावे लागले.
‎
‎नेपाळ : चीन समर्थक पंतप्रधान के.पी. ओली यांना ‘जनरेशन झी’च्या नेतृत्वाखालील आंदोलनांमुळे राजीनामा द्यावा लागला.

‎
‎या घटनांवरून असे दिसून येते की, अमेरिका दक्षिण आशियामध्ये एका मोठ्या भू-राजकीय रणनीतीचा भाग म्हणून आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असे अँड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.


       
Tags: americanepal newsNew DelhiPrakash Ambedkarsocial mediasouth asiaVanchit Bahujan AaghadivbafotindiaYouth
Previous Post

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा (डीआरपी) मार्ग मोकळा: सरदार वल्लभभाई पटेल नगरातील ६५% घरे पुनर्वसनासाठी पात्र

Next Post

परभणी जिल्ह्यात मुस्लिम बांधवांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

Next Post
परभणी जिल्ह्यात मुस्लिम बांधवांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

परभणी जिल्ह्यात मुस्लिम बांधवांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?
बातमी

कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?

by mosami kewat
August 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र निरंजन पातोडे यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु महाराष्ट्रभर त्यांच्या...

Read moreDetails
नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

August 5, 2026
शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

August 5, 2026
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

August 5, 2026
लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

August 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home