Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home मनोरंजन

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी; वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

mosami kewat by mosami kewat
August 31, 2025
in मनोरंजन
0
मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी; वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी; वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन झाले आहे. त्या ३८ वर्षांच्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. मध्यंतरी त्या या दुर्धर आजारातून बरी देखील झाल्या होत्या. मात्र, पुन्हा त्यांच्या शरीरात कर्करोग पसरू लागला. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. मुंबईतील मीरारोड परिसरातील निवासस्थानी त्यांचे निधन झाले आहे.
‎
‎अभिनेत्री प्रिया यांनी ‘पवित्र रिश्ता’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ आणि ‘चार दिवस सासूचे’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली होती. त्यांना अनेक आरोग्य समस्यांमुळे त्यांना ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका अर्धवट सोडावी लागली होती.
‎
‎ठाणे येथे २३ एप्रिल १९८७ रोजी त्यांचा जन्म झाला होता. प्रिया मराठे यांनी २००६ साली ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेतून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बड़े अच्छे लगते हैं’, ‘तू तिथे मी’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘चार दिवस सासूचे’ यांसारख्या अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केले.
‎
‎तसेच ‘विघ्नहर्ता महागणपती’ (२०१६) आणि ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ (२०१६) या मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
‎

Tags: Actress diesentertainmentHindi TV actressMaharashtraMarathi actressMarathi film industrymumbaiPavitra Rishtapriya marathe
Previous Post

भटके-विमुक्त समाज : स्वातंत्र्यानंतरही ओळखीच्या शोधात

Next Post

दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याने खळबळ उडाली

Next Post
दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याने खळबळ उडाली

दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याने खळबळ उडाली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रगती जगताप राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीतून राज्यात प्रथम!
बातमी

प्रगती जगताप राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीतून राज्यात प्रथम!

by mosami kewat
November 1, 2025
0

वंचित बहुजन आघाडीचे माजी नगरसेवक दिवंगत सुनील जगताप यांची कन्या! अकोला : राज्यसेवेची पूर्व परीक्षा असताना, वडिलांचे अचानक निधन झाले....

Read moreDetails
नवा विश्वविजेता कोण? भारत-दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषक अंतिम सामना उद्या, जाणून घ्या सामना तपशील

नवा विश्वविजेता कोण? भारत-दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषक अंतिम सामना उद्या, जाणून घ्या सामना तपशील

November 1, 2025
वंचितच्या इशाऱ्यानंतर बीएमसी आयुक्तांची अधिकाऱ्यांना विशेष सूचना..!

वंचितच्या इशाऱ्यानंतर बीएमसी आयुक्तांची अधिकाऱ्यांना विशेष सूचना..!

November 1, 2025

RSS प्रणित फेसबुक पेजविरुद्ध वंचित बहुजन आघाडीची कारवाई – पुण्यात गुन्हा दाखल

November 1, 2025
नोटीसकडे दुर्लक्ष का? – उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचा सवाल; कारवाईचा इशारा

नोटीसकडे दुर्लक्ष का? – उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचा सवाल; कारवाईचा इशारा

November 1, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home