परभणी : परभणी येथील राहुल नगरमधील विशाखा बुद्ध विहारात आयोजित वर्षावास कार्यक्रमात ज्येष्ठ बौद्ध एम. एम. भरणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी असलेले योगदान या विषयावर महत्त्वपूर्ण धम्मप्रवचन दिले.
यावेळी बोलताना एम. एम. भरणे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील भारतीयांना बौद्ध धम्म देऊन ज्या लोकांचे माणूसपण हिरावून घेतले गेले होते, त्यांना पुन्हा माणूस बनवले. त्यांनी या लोकांना जगण्याचा संवैधानिक अधिकार दिला. देशासाठी बहुमोल असे संविधान लिहून, ‘एक व्यक्ती, एक मूल्य’ या समतेच्या सूत्राने देशाला एकसंध ठेवण्याचे मोठे योगदान दिले, असे प्रतिपादन एम. एम. भरणे यांनी केले.
बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ॲड. भीमरावजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार ही वर्षावास प्रवचन मालिका राबवण्यात येत आहे, असे भरणे यांनी सांगितले. या मालिकेअंतर्गत ते विविध विषयांवर वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचन देत आहेत.
या वर्षीही दरवर्षीप्रमाणे आषाढ पौर्णिमेपासून म्हणजेच दि. १० जुलै २०२५ पासून वर्षावास कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या वर्षावास निमित्ताने वैशाली महिला मंडळाच्या वतीने राहुल नगर येथे ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन सुरू करण्यात आले आहे. दररोज दुपारी २ वाजता प्रियतमा उबाळे या ग्रंथाचे वाचन करतात. या प्रसंगी एम. एम. भरणे यांच्या हस्ते भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सामूहिक वंदना घेण्यात आली. शालिनीबाई साबने यांनी भरणे यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला शालिनीबाई साबने, कांताबाई साबने, शशिकला मोरे, कल्पना गायकवाड, शशिकला दैलतराव मोरे, लीला खिल्लारे, चंद्रकला गायकवाड, शीला खिल्लारे, गुंफाबाई गवई, सुवर्णा दुधाटे, सरस्वती गायकवाड, साळुबाई शिंदे, कलावती मुळे, वर्षा हतीअंबिरे, बेबीताई जाधव, कमलाबाई मुजमुले, केशर कुरवाडे, राजाबाई कांबळे (पूर्णा), शारदा मुळे, यशवंत मोरे, नागोराव वाघमारे, विठ्ठल कांबळे (पूर्णा) यांसह बहुसंख्य उपासक-उपासिकांनी धम्मश्रवण केले. शेवटी त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
Cheteshwar Pujara: पुजाराचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ची मोठी इनिंग संपली
भारतीय क्रिकेटमधील 'कसोटी स्पेशलिस्ट' आणि संघाची 'नवी भिंत' म्हणून ओळखला जाणारा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर...
Read moreDetails