सोलापूर : वंचित बहुजन युवा आघाडीने आज सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. या बैठकीत संघटनेच्या वाढीवर, वैचारिक भूमिकेवर आणि सामाजिक न्यायाच्या कार्यावर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
या मुलाखतीदरम्यान, अनेक तरुण कार्यकर्त्यांनी संघटनेला बळकट करण्यासाठी आपले विचार मांडले. आगामी काळात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि सामाजिक न्याय व बहुजन चळवळीचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन धोरणे आखण्यात आली.
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य व जिल्हा प्रभारी अमोल लांडगे, जिल्हाध्यक्ष दिपसागर (पंकज) पाराध्ये, जिल्ह्याचे नेते पॅंथर आतिश बनसोडे, युवा शहराध्यक्ष महेश (एम.जे.) जाधव, सचिव नरेंद्र शिंदे, सहसचिव चंद्रकांत सुरवसे, संघटक सौरभ चवरे व रितेश दुपारगुडे, जिल्हा सचिव दत्तात्रय कापुरे, तसेच वैभव भंडारे, अजय गाडे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा प्रभारी अमोल लांडगे म्हणाले, “तरुण कार्यकर्त्यांचा ऊर्जासंपन्न सहभाग हा वंचित बहुजन युवा आघाडीच्या उज्ज्वल भविष्याची ठोस खात्री देतो.” सोलापूर जिल्ह्यातील तरुणांचा उत्साह आणि संघटनेवरील विश्वास या बैठकीत स्पष्टपणे दिसून आला. या बैठकीमुळे युवा नेतृत्व अधिक एकजूट झाले असून, ते भविष्यात सशक्त राजकीय आणि सामाजिक भूमिका बजावतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
पुण्यात समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशात बेकायदा उपवर्गीकरण? वंचित बहुजन युवा आघाडीचा आरोप
पुणे : समाज कल्याण विभागाच्या पुणे येथील वसतिगृह प्रवेश प्रक्रियेवर वंचित बहुजन युवा आघाडीने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोरेगाव...
Read moreDetails