दापोली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सम्यक विद्यार्थी आंदोलन, दापोली तालुका यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी असलेले योगदान या विषयावर विशेष व्याख्यानाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद सावंत उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या उभारणीसाठी केलेल्या योगदानाची सखोल माहिती सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष चेतन जाधव यांनी भूषवले.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य सचिव तथा रत्नागिरी जिल्हा निरीक्षक ॲड. मयूर मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी देखील डॉ. आंबेडकरांच्या कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक जागरुकता निर्माण केली. वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि स्थानिक गावांमधून आलेले अनेक नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.