यवतमाळ : देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत हर्षोल्हासात पार पडला. सकाळी ८ वाजता जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व राष्ट्रध्वजाचे पूजन करून उपस्थित कार्यकर्त्यांच्या जयघोषात तिरंगा फडकावला.
या सोहळ्यास जिल्हा महासचिव मा. शिवदास कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोले, शहर महासचिव प्रमोद पाटील, शहर उपाध्यक्ष विलास वाघमारे, उत्तमराव कांबळे, सुधीर खोब्रागडे, नितेश पाटील, तसेच महिला आघाडीच्या माजी पदाधिकारी पुष्पा शिरसाट, करुणा मून, भारतीताई सावते, मीना रणीत, शोभना कोटंबे, संध्या काळे, रत्नमाला कांबळे, करूणा चौधरी, सविता तिडके, संगीता भवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच वंचितचे हितचिंतक दिपक नगराळे, शैलेश भानवे, अरविंद दिवे, सचिन मोहोड, गुणवंत मानकर, संदीप भगत, धर्मपाल भितकर, निरंजन खडसे, गजानन कोकाटे, स्वप्निल कोल्हे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.