अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील इंदिरा नगर येथील पल्लवी सागर गंगावणे यांच्यावर झालेल्या विनयभंग, मारहाण, चोरी आणि बदनामीच्या प्रकरणात संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, अहिल्यानगर ने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात , संगमनेर तालुक्यातील तलाठी मच्छिंद्र राहाणे यांनी पल्लवी गंगावणे यांचा रात्री उशिरा वारंवार फोन करून, घराचे दार ठोठावून आणि अश्लील संदेश पाठवून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पल्लवी यांनी हा प्रकार तलाठ्याच्या पत्नीला सांगितल्यानंतर, सूडबुद्धीने राहाणे यांनी आकाश उर्फ पप्पू गोडगे आणि त्याच्या साथीदार दहा महिलांच्या मदतीने पल्लवी यांच्या घरावर हल्ला केला.
या हल्ल्यात पल्लवी आणि त्यांच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. तसेच, त्यांच्यावर जातीय अपमानकारक शिवीगाळ करत, त्यांचा मोबाईल फोन आणि सोन्याचे गंठण हिसकावून नेण्यात आले. या घटनेनंतर तलाठी राहाणे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पल्लवी यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले. एवढेच नाही, तर सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट प्रसारित करून त्यांचा मानसिक छळ केला. आरोपी जामिनावर असतानाही पल्लवी यांच्या घरातील वस्तूंची चोरी केल्याची तक्रारही निवेदनात नमूद आहे.
या प्रकरणात आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भादंवि कलम ३५४, ३५४(अ), ३९२, ३८०, ५०६, ५०९, ५००, ३४ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष योगेश साठे, युवा शहर अध्यक्ष ॲड. योगेश गुंजाळ, नगर तालुकाध्यक्ष रविकिरण जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्याला काय फरक पडतो? ही आत्मघातकी मानसिकता सोडा; जागतिक अर्थकारण तुमच्या आयुष्यात उतरले आहे!
आपल्याला काय फरक पडतो ? जगामध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल असा प्रश्न दीर्घकाळात आत्मघातकी सिद्ध होतो. खरेतर खूप फरक पडतो हे सिद्ध...
Read moreDetails






