Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

डॉक्टरांच्या क्रूरतेने बोकारो हादरले: उपचाराचे पैसे थकवल्याने रुग्णावर कैचीने हल्ला

mosami kewat by mosami kewat
August 12, 2025
in बातमी
0
डॉक्टरांच्या क्रूरतेने बोकारो हादरले: उपचाराचे पैसे थकवल्याने रुग्णावर कैचीने हल्ला

डॉक्टरांच्या क्रूरतेने बोकारो हादरले: उपचाराचे पैसे थकवल्याने रुग्णावर कैचीने हल्ला

झारखंड : बोकारो जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारानंतर पैसे न दिल्याने एका क्रूर डॉक्टरने रुग्णावर कैचीने जीवघेणा हल्ला केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
‎
‎मिळालेल्या माहितीनुसार, सतणपूर येथे राहणारा गोविंद बाउरी हा रुग्ण डॉक्टर पी. कुमार यांच्याकडे उपचारासाठी गेला होता. उपचारासाठी त्याने काही पैसे दिले, पण उरलेले २०० रुपये त्याने नंतर देतो असे सांगितले. यासाठी त्याने डॉक्टरांकडून दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र, डॉक्टर कुमार यांनी आपल्या दवाखान्यात गोविंदवर कैचीने पाठीवर, छातीवर आणि चेहऱ्यावर वार केले. यामुळे गोविंद गंभीर जखमी झाला आहे.
‎
‎पैशांच्या वादातून डॉक्टरांनी केले वार
‎
‎सतणपूर गावातील एका खोलीत डॉक्टर पी. कुमार आपला दवाखाना चालवतो. सोमवारी, गोविंद बाउरी हा कामावरून परत येत असताना डॉक्टरने त्याला बोलावले आणि उरलेले पैसे मागितले. त्यावेळी गोविंदने त्याला आणखी दोन आठवड्यांची मुदत मागितली. यावर डॉक्टर संतापले आणि त्यांनी कैचीने गोविंदवर हल्ला केला. गोविंदच्या पाठीवर चार वार करण्यात आले, तसेच चेहऱ्यावरही वार केल्याने डोळा थोडक्यात बचावला. गंभीर जखमी अवस्थेत गोविंदने तिथून पळ काढला आणि थेट पोलीस ठाणे गाठले.

‎पोलिसांनी तात्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून फरार झालेल्या आरोपी डॉक्टरला लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Tags: Bokarocrimedoctorejharkhand
Previous Post

अवाढव्य बिलांमुळे चोहट्टा येथील रहिवासी त्रस्त; वंचित बहुजन आघाडीचे MSEB कार्यालयावर धडक

Next Post

‘काही चुका होणं स्वाभाविक’ जिवंत लोकांना मृत दाखवल्याच्या दाव्यावर सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

Next Post
'काही चुका होणं स्वाभाविक' जिवंत लोकांना मृत दाखवल्याच्या दाव्यावर सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

'काही चुका होणं स्वाभाविक' जिवंत लोकांना मृत दाखवल्याच्या दाव्यावर सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश
बातमी

जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

by mosami kewat
August 24, 2026
0

नांदेड : जयभीम नगर येथे मागील अनेक दिवसांपासून पाईपलाईन खराब झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या समस्येची...

Read moreDetails
पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

August 24, 2026
पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 24, 2026
देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

August 24, 2026
Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार - राजेंद्र पातोडे

Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार – राजेंद्र पातोडे

August 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home