अॅड. प्रकाश आंबेडकरांचे विरोधी पक्षांना आवाहन: ‘ ७६ लाख मतदानाच्या वाढीविरोधातील याचिकेत सहभागी व्हा’
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षांना ७६ लाख मतदानाच्या वाढीविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, केवळ मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, तर कोर्टातूनच आपल्याला न्याय मिळू शकतो. जर विरोधी पक्षांचा लढा खरा असेल तर त्यांनी या याचिकेत एक पक्ष म्हणून सहभागी व्हावे.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, आम्ही जेव्हा विरोधी पक्षांना उच्च न्यायालयात जाऊ आणि निवडणूक आयोगाला विचारू की जर तुमच्याकडे कागदपत्रे नसतील, तर ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष कशी झाली? हे आम्हाला सांगा आणि ७६ लाख मतदान हे मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदारांनीच केले आहे का? हे विचारू, असे पत्र लिहिले होते. पण, त्यावेळी कोणीही आमच्या बाजूने उभे राहिले नाही.
मुंबई उच्च न्यायालयाने ७६ लाख मतदानाच्या वाढीची याचिका फेटाळली असली तरी, आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या याचिकेमध्ये तरी विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुढे त्यांनी म्हटले की, कोर्टाच्या माध्यमातूनच आपण निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू शकतो की, ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष कशी झाली? ते आम्हाला सांगा. या मुद्द्यावर लढा देण्यासाठी कोर्टातील सहभाग आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.
Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन...
Read moreDetails