Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जल्लोषात सत्कार

mosami kewat by mosami kewat
January 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जल्लोषात सत्कार
       

अकोला : अकोला महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर, नवनियुक्त नगरसेवकांचा जिल्हा शाखेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. टावर चौक येथील पक्ष कार्यालयात आयोजित या सोहळ्यात नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासाचा आणि निष्ठेचा शब्द दिला.

अकोला महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचे निलेश देव, पराग गवई, उज्वला प्रवीण पातोडे, शेख शमशू शेख साबीर आणि जयश्री महेंद्र बहादुरकर हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि नवनियुक्त नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. नैतिकउद्दीन खतीब होते, तर प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र पातोडे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवनियुक्त नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

“अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही दिवस-रात्र प्रयत्न करू.” अशा भावना नवनियुक्त नगरसेवकांनी व्यक्त केल्या.

या सोहळ्याला आम्रपाली खंडारे, धीरज इंगळे, मजहर खान, गजानन गवई, मनोहर बनसोड, सुनील मानकर, सुनील फाटकर, शोभा शेळके, गोरसिंग राठोड, पवन बुटे, किशोर जामनिक, मंगला शिरसाट, लक्ष्मी  वानखडे, अर्चना डाबेराव, नितीन सपकाळ,

शंकर इंगोले, रामा तायडे, पुरुषोत्तम वानखडे, निलेश वाहुरवाघ, विकास सदांशिव, सतीश चोपडे, संतोष कीर्तक, सुयोग आठवले, उमेश देवतडे, वासिफ खान, अन्सार, देवानंद अंभोरे, प्रदीप शिरसाट, गजानन दांडगे, उमाताई अंभोरे, हर्षल लोखंडे, आतिश शिरसाट आणि गोपाल ढोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: AkolaElectionMaharashtraMunicipal corporation electionpoliticsVanchit Bahujan AaghadivbaforindiaWinner candidateWord
Previous Post

काँग्रेसच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत वंचितला फटका; सिद्धार्थ मोकळे

Next Post

चळवळीचा निष्ठावंत, गरीब कवी गायक नगरसेवक होणे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय चमत्कार आहे – प्रा. डॉ. किशोर वाघ

Next Post
चळवळीचा निष्ठावंत, गरीब कवी गायक नगरसेवक होणे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय चमत्कार आहे – प्रा. डॉ. किशोर वाघ

चळवळीचा निष्ठावंत, गरीब कवी गायक नगरसेवक होणे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय चमत्कार आहे - प्रा. डॉ. किशोर वाघ

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
बातमी

नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

by mosami kewat
April 30, 2026
0

Budget 2026 : नांदेड महानगरपालिकेच्या होणाऱ्या अर्थसंकल्प बैठकीपूर्वी मनपाच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सन 2022 ते 2025...

Read moreDetails
हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

April 28, 2026
मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

April 28, 2026
टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

April 28, 2026
रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

April 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home