Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुणे पोलिसांकडून सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ; ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी

mosami kewat by mosami kewat
August 3, 2025
in बातमी
0
पुणे पोलिसांकडून सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ; 'ॲट्रॉसिटी'अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी

पुणे पोलिसांकडून सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ; 'ॲट्रॉसिटी'अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी

       

‎पुणे : पुण्यात तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांना कोथरूड पोलिसांनी एका पीडित महिलेला मदत केल्याबद्दल पीडित तरुणींनी पोलिसांवर जातीवाचक शिवीगाळ, अश्लील शब्द वापरणे आणि मारहाणीचा आरोप केला आहे. कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट न देता ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.
‎
‎या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी पीडित तरुणींसोबत पुणे पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. त्यांनी संबंधित पोलिसांवर ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
‎
‎या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनीही पीडित तरुणींशी संपर्क साधून त्यांना पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडी पीडित तरुणींच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
‎
‎‎नेमकं काय घडलं?
‎
‎औरंगाबादमधील एक विवाहित महिला पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिला मदत करण्यासाठी पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्या महिला पुढे आल्या. त्यांनी तिला ‘वन स्टॉप सखी सेंटर’मध्ये दाखल केलं आणि तिला स्वावलंबी होण्यासाठी मदत केली.
‎
‎या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती औरंगाबादमध्ये निवृत्त पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले जाते. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुणे पोलिसांची मदत घेतली, असा आरोप आहे. यानंतर कोथरूड पोलिसांनी कोणत्याही वॉरंटशिवाय या तीन महिलांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं.
‎
‎महिलांचे आरोप
‎
‎पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला वेगळ्या खोलीत नेऊन मारहाण केली. तसेच जातीवाचक आणि अपमानास्पद शिवीगाळ केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. “तू महार-मांगाची आहेस का?”, “तू रां** आहेस”, मुलांसोबत झोपतेस का?”, “तुम्ही सगळे LGBT आहात का?” अशी अपमानास्पद भाषा वापरली गेल्याचंही त्यांनी सांगितलं. सहायक पोलीस निरीक्षक (API) प्रेमा पाटील आणि औरंगाबाद येथील कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी आपल्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा दावा या महिलांनी केला आहे. त्यांना पाच तास रिमांड रूममध्ये ठेवण्यात आले आणि त्यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले होते.
‎
‎या महिलांनी मानवी आणि कायदेशीर हक्कांच्या उल्लंघनासंदर्भात पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, २४ तास उलटूनही पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल केली नाही. तसेच मारहाण झालेल्या महिलेला वैद्यकीय तपासणीची परवानगीही नाकारण्यात आली. या घटनेमुळे पीडितांना मदत करण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही, अशी भीती या महिलांनी व्यक्त केली आहे.
‎
‎पोलिसांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. छत्रपती औरंगाबादमधील एका मिसिंग प्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांनी फक्त सहकार्य केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारची मारहाण किंवा जातीवाचक शिवीगाळ झाली नाही, असंही त्यांनी सांगितलं.
‎
‎


       
Tags: aurangabadcrimeFIRpolicepuneSocial Workerswoman
Previous Post

वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘गाव तिथे शाखा’ अभियान: ५ नवीन शाखांचे फलक अनावरण

Next Post

चाळीसगावात ६५ कोटींचे ड्रग्ज पकडले, मुख्य सूत्रधाराला तामिळनाडूतून अटक

Next Post
चाळीसगावात ६५ कोटींचे ड्रग्ज पकडले, मुख्य सूत्रधाराला तामिळनाडूतून अटक

चाळीसगावात ६५ कोटींचे ड्रग्ज पकडले, मुख्य सूत्रधाराला तामिळनाडूतून अटक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Anil Ambani : अनिल अंबानी ईडीच्या चौकशीला सामोरे; १७,००० कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी हजर
बातमी

Anil Ambani : अनिल अंबानी ईडीच्या चौकशीला सामोरे; १७,००० कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी हजर

by mosami kewat
August 5, 2025
0

नवी दिल्ली : रिलायन्स एडीएजी समुहाचे प्रमुख, उद्योगपती अनिल अंबानी यांना १७,००० कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी)...

Read moreDetails
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे हाहाकार, अनेक घरं उद्धवस्त, बचावकार्य सुरू

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे हाहाकार, अनेक घरं उद्धवस्त, बचावकार्य सुरू

August 5, 2025
वंचित बहुजन आघाडीच्या लातूर तालुका कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

वंचित बहुजन आघाडीच्या लातूर तालुका कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

August 5, 2025
ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

August 5, 2025
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल; सोलापूर येथे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल; सोलापूर येथे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

August 5, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home