Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home विशेष चळवळीचा दस्तऐवज

शहिद सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी FIR दाखल;चौकशी समिती गठीत होणार

Tanvi Gurav by Tanvi Gurav
August 2, 2025
in चळवळीचा दस्तऐवज, बातमी, मुख्य पान, विशेष, सामाजिक
0
शहिद सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी FIR दाखल

शहिद सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी FIR दाखल

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

मुंबई : परभणीतील शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला कायम ठेवत दाखल झालेल्या एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवरून दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आता या प्रकरणात चौकशी समिती गठीत केली जाणार असून त्यानंतर औपचारिक चौकशीस सुरूवात होणार आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिस कोठडीत अमानुष मारहाण झाल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाला. प्रारंभी पोलिसांनी मृत्यूचे कारण ‘हृदयविकाराचा झटका’ असल्याचे सांगितले होते.

मात्र, वैद्यकीय अहवालामुळे हा दावा फोल ठरला. विजयाबाई यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात त्या निर्णयाला विरोध केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत स्पष्ट निर्देश दिले की आरोपींचं नाव माहीत नसले तरी एफआयआर दाखल होऊ शकतो. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला कायम ठेवत शहिद सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. या संदर्भात चौकशी समिती गठीत केली की चौकशीला सुरुवात होईल. हा निर्णय केवळ एका कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी संविधानिक न्यायाचा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत लढा सुरू राहील, अशी अपेक्षा आहे.

Tags: MaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पुस्तक परीक्षण -जीवन चलने का नाम

Next Post

SSC परीक्षांमधील गोंधळ: वंचित बहुजन आघाडीचा विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा आंदोलनाचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
LPG Prices Hike : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ; हॉटेल व्यवसायावर वाढणार आर्थिक ताण
बातमी

LPG Prices Hike : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ; हॉटेल व्यवसायावर वाढणार आर्थिक ताण

by mosami kewat
June 1, 2026
0

नवी दिल्ली : महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक ग्राहकांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक...

Read moreDetails
पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

June 1, 2026
सर्वोच्च न्यायालयासाठी पाच नव्या न्यायाधीशांच्या नियुक्तीला केंद्राची मंजुरी; मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचेही नाव

सर्वोच्च न्यायालयासाठी पाच नव्या न्यायाधीशांच्या नियुक्तीला केंद्राची मंजुरी; मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचेही नाव

June 1, 2026
औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन; पदाधिकारी उपस्थित!

औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन; पदाधिकारी उपस्थित!

June 1, 2026
नांदेड: चिखलीतील मराठा युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

नांदेड: चिखलीतील मराठा युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

June 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home