Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सोलापूर: सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे ‘वंचित’कडून स्वागत

mosami kewat by mosami kewat
August 1, 2025
in बातमी
0
सोलापूर: सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे 'वंचित'कडून स्वागत

सोलापूर: सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे 'वंचित'कडून स्वागत

‎सोलापूर : वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर आणि जिल्ह्याने सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या न्यायालयीन लढाईला यश मिळाल्याचे पक्षाने म्हटले आहे.
‎
‎औरंगाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वीच पोलिसांना संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकार आणि पोलिसांनी या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कायदेशीर टीमने केलेल्या प्रभावी युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
‎
‎या निकालानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाल्याची भावना वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केली आहे. पक्षाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई, विजयाबाई सूर्यवंशी, यांच्या धैर्याचे आणि बाळासाहेब आंबेडकरांवरील विश्वासाचे कौतुक केले. या लढ्यात विजयाबाई यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
‎
‎या निकालाचे स्वागत करताना सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर आणि विजयाबाई सूर्यवंशी यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीनेही या निकालाचे स्वागत करत अभिनंदन केले.

Tags: solapurSomnath Suryawanshi murder casesupreme courtvbaforindia
Previous Post

पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

Next Post

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यात वंचित बहुजन आघाडीची अभिवादन सभा

Next Post
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यात वंचित बहुजन आघाडीची अभिवादन सभा; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यात वंचित बहुजन आघाडीची अभिवादन सभा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश; शिरड शहापूर येथे दर बुधवारी HP गॅस गाडी येणार
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश; शिरड शहापूर येथे दर बुधवारी HP गॅस गाडी येणार

by mosami kewat
June 10, 2026
0

शिरड शहापूर : वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक अनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाला...

Read moreDetails
उमरखेडच्या विश्वजीत धुळेची भारतीय सैन्यात निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान!

उमरखेडच्या विश्वजीत धुळेची भारतीय सैन्यात निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान!

June 10, 2026
भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; ४७ लाखांचा पनीर-खवा साठा जप्त, राज्यभरात १९२ जणांना अटक

भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; ४७ लाखांचा पनीर-खवा साठा जप्त, राज्यभरात १९२ जणांना अटक

June 10, 2026
स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्या; वंचित बहुजन आघाडीचा दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पावर भव्य रोजगार हक्क मोर्चा

स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्या; वंचित बहुजन आघाडीचा दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पावर भव्य रोजगार हक्क मोर्चा

June 10, 2026
ब्राव्हो, सार्थक सिद्धार्थ ! आज देशाला अशा लाखो सार्थक सिद्धार्थची गरज आहे. 

ब्राव्हो, सार्थक सिद्धार्थ ! आज देशाला अशा लाखो सार्थक सिद्धार्थची गरज आहे. 

June 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home