यवतमाळ : लोकशाहीर, कवी, लेखक आणि थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यामध्ये पाटीपुरा येथील अण्णाभाऊ साठे चौक, नेताजी नगरातील अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा आणि लोहारा येथील प्रतिमेचा समावेश होता. तसेच, पाटीपुरा चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ. नीरज वाघमारे (जिल्हाध्यक्ष, यवतमाळ), शिवदास कांबळे (जिल्हा महासचिव), गजानन सावळे (शहराध्यक्ष), विलास वाघमारे (शहर उपाध्यक्ष), अरविंद दिवे, गजानन कोकाटे, शैलेश भानवे, शोभनाताई कोटंबे, निशाताई निमकर, शालिनी घायवान, कमलाबाई गायकवाड, सुनिता मेश्राम, अनिता मुगले, मेघा वानखेडे, बेबी गायकवाड, रंजना मुंगले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.