बीड : पाटोदा तालुक्यातील विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाटोदा येथे हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष अजय सरोदे यांनी केले. या मोर्चात तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम वीर, सचिन मेघडंबर, भारत तांगडे, अंकुश जाधव, शिरूर तालुका अध्यक्ष दिलीप माने, तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या यशस्वी मोर्चाच्या आयोजनाबद्दल पाटोदा तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांचे अभिनंदन करण्यात आले. या मोर्चाद्वारे वंचित बहुजन आघाडीने पाटोदा तालुक्यातील जनतेच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.
विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचा उद्या गोवंडीमध्ये जन आक्रोश मोर्चा
मुंबई : गोवंडीतील एम पूर्व वॉर्डमधील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 'जन आक्रोश मोर्चा' उद्या आयोजित करण्यात आला...
Read moreDetails






