Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडीची सत्ता!

mosami kewat by mosami kewat
July 31, 2025
in बातमी, सामाजिक
0
तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडीची सत्ता!

तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडीची सत्ता!

सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे श्याम भोंगे यांची निवड

अकोला : अकोला जिल्ह्यात महत्वपूर्ण असलेल्या तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती यांची निवडणूक आज झाली. या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व धनगर समाज संघटनेचे पदाधिकारी श्याम भोंगे यांची तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली, तर उपसभापती म्हणून शेतकरी पॅनलचे हरिदास वाघ यांची बिनविरोध निवड झाली. संपूर्ण विदर्भामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आतापर्यंत ही धनगर समाजाला कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सभापती म्हणून कोणत्याच पक्षांनी आघाड्यांनी संधी दिली नव्हती.

बाळासाहेब आंबेडकर यांनी श्याम भोंगे यांच्या माध्यमातून तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती करून धनगर समाजाला सहकार क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करण्याची या माध्यमातून संधी दिली. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांमध्ये व धनगर समाजामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. आज सभापती म्हणून निवड झाल्यानंतर श्याम भोंगे यांचे जंगी स्वागत करून तेल्हारा मध्ये मिरवणूक काढण्यात आली.

या वेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. तर तालुकाध्यक्ष अशोक दारोकार माजी सभापती सुनील इंगळे, संचालक मोहन पात्रीकर, गोपाल कोल्हे, श्रीकृष्ण जुमडे, सुमित गवारगुरु, संदीप गवई, श्रीकृष्ण वैतकार, रवि भाऊ भिसे, जीवन बोदडे, पंजाब तायडे, बाबूजी खोब्रागडे, मधुसूदन बरिंगे, रतन दांडगे, इद्रिस भाई, इत्यादी उपस्थित होते.

यावेळी सभापती म्हणून निवड झालेल्या श्याम भोंगे यांनी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुळे विदर्भात पहिली वेळ सहकार क्षेत्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती म्हणून धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिल्याबद्दल ऍड. बाळासाहेब आंबेडकर व अंजलीताई आंबेडकर यांचे आभार मानले.

Tags: AgriculturalAPMCElectionShyam BhongeTelharavbaforindiaVice-Chairman election
Previous Post

रशियाजवळ शक्तिशाली भूकंप आणि त्सुनामी, पाठोपाठ ज्वालामुखीचा उद्रेक!

Next Post

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी; विदर्भात सतर्कतेचा इशारा, धरणांमधून विसर्ग घटला

Next Post
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी; विदर्भात सतर्कतेचा इशारा, धरणांमधून विसर्ग घटला

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी; विदर्भात सतर्कतेचा इशारा, धरणांमधून विसर्ग घटला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लिंबे वडगाव भूसंपादन घोटाळा प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बातमी

लिंबे वडगाव भूसंपादन घोटाळा प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

by mosami kewat
July 2, 2026
0

जालना : मंठा तालुक्यातील लिंबे वडगाव येथील पाटोदा साठवण तलाव भूसंपादन प्रकरणातील कथित अनियमितता आणि भूसंपादन अनुदान घोटाळ्याच्या निषेधार्थ वंचित...

Read moreDetails
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

July 2, 2026
सुखदेव जी महाराजांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांची श्रद्धांजली; समाज प्रबोधनातील योगदानाला सलाम

सुखदेव जी महाराजांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांची श्रद्धांजली; समाज प्रबोधनातील योगदानाला सलाम

July 1, 2026
शिक्षणमंत्री दादा भुसे विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; मंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन!

शिक्षणमंत्री दादा भुसे विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; मंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन!

July 1, 2026
रिकामे महाल, बेघर नागरिक: K-शेप अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र

रिकामे महाल, बेघर नागरिक: K-शेप अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र

July 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home