मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या त्यांच्या कथित मैत्रीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ट्रम्प भारताला ‘मित्र’ म्हणत असतानाही, त्यांची धोरणे मात्र भारतासाठी हानिकारक ठरत असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे.
जून महिन्यात मोदींनी ट्रम्प यांना भारतासमोर मित्र संबोधले होते. याच संदर्भाला धरून ॲड. प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे, मोदीजी, तुमचा हा कोणता मित्र आहे? त्यांनी ट्रम्प यांच्या भारताबाबतच्या भूमिकेवर आणि पाकिस्तानसोबतच्या वाढत्या जवळीकीवर गंभीर आक्षेप घेतला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकरांनी यांनी टीका करताना म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% रेसिप्रोकल टॅक्स लावला आहे. तसेच, भारताने रशियाकडून लष्करी उपकरणे खरेदी केल्यास दंड आकारण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिका भारताला स्पष्टपणे चेतावणी देत आहे की त्यांनी सांगितलेल्या मार्गावरच चालावे, असे आंबेडकर म्हणाले. यातून अमेरिकेची भारताकडे पाहण्याची भूमिका स्पष्ट होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, अमेरिका पाकिस्तानसोबत जवळीक वाढवत असल्याचेही आंबेडकरांनी निदर्शनास आणले आहे. अमेरिकेने पाकिस्तानसोबत संयुक्तपणे तेल साठे विकसित करण्यासाठी एका तेल व्यापार कराराची घोषणा केली आहे, यावर त्यांनी भर दिला.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी मोदींना थेट प्रश्न विचारला आहे, मोदीजी, तुमचा हा कोणता मित्र आहे? हे तर शत्रूसारखे काम करत आहेत!” त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, तुमची ट्रम्पसोबतची मैत्री संपूर्ण भारताला महागात पडत आहे!
ॲड. प्रकाश आंबेडकरांनी आपल्या ट्विटमध्ये मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण फसवणूक करणारा मित्र आणि अयशस्वी परराष्ट्र धोरण हीच मोदींची उपलब्धी! अशा शब्दांत जोरदार टीका केली आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालय निविदा घोटाळा : डांबरेसह तिन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ;वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी
अकोला : अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी (SNCU) 2024-25 मध्ये झालेल्या निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार उघड झाल्याचा...
Read moreDetails