रशिया : कामचटकामध्ये आज 8.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने जमीन हादरली. समुद्राखाली झालेल्या या भूकंपामुळे मोठ्या त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे अमेरिका आणि जपानमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
कामचटकामध्ये शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा धोका, जनजीवन विस्कळीत
आज (30 जुलै) रशियातील कामचटका प्रदेशात समुद्राखाली 8.7 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, त्याची तीव्रता स्पष्ट करणाऱ्या घटनास्थळावरील काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भूकंपाचे केंद्र समुद्रात असल्याने त्सुनामीचा धोका अधिक तीव्र झाला आहे.
अमेरिका आणि जपानमध्ये त्सुनामीचा इशारा
या शक्तिशाली भूकंपानंतर अमेरिका आणि जपानमध्ये थेट त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन तासांत रशिया आणि जपानच्या काही भागांमध्ये धोकादायक त्सुनामी लाटा धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाने परिस्थिती हाताळण्यासाठी तयारी सुरू केली असून, लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोठ्या नुकसानीची शक्यता, प्रशासन सज्ज
या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र नुकसानीची नेमकी आकडेवारी अजून स्पष्ट झालेली नाही. भूकंपाचे केंद्र समुद्रात असल्याने, किनारपट्टी भागांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
कामचटकामध्ये भूकंपाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, 20 जुलै रोजी याच प्रदेशात 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. सध्या पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत, कारण त्सुनामीचा धोका अजूनही कायम आहे.
IND vs ENG: लॉर्ड्सवरील चेंडू बदल वाद चिघळला; भारताची आयसीसीकडे तक्रार, पंचांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत लॉर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेंडू बदलण्यावरून मोठा वाद निर्माण...
Read moreDetails