सागर नाईक
प्रसिद्ध तत्वज्ञ कॉर्नेल बेस्ट यांनी मारखंडना नाट्याला आलेल्या काळ्या अमेरिकन लोकांच्या ‘कलंकित’ अनुभवाला व्याख्यांकित करताना ‘अस्तित्वावरील जखम’ (ontological wounding) अशी संकल्पना वापरली आहे. बाचा अर्थ एखाद्या समुहातून येणाऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वावरच हिनत्वदर्शक, आणि अमानत्रीकरण घडविणाऱ्या जखमा केल्या जातात, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेचा इतिहास असलेल्या आपल्या देशात या गोष्टीचा प्रत्यय येतो. बायाहतिक काळात ‘जन्मानेब गुन्हेगार’ आणि स्वातंत्र्योत्तर काळात ‘संशयित गुन्हेगार’ समजल्या जाणाऱ्या भटक्या विमुक्त समूहांना तर हि संकल्पना अधिकव चपखल बसते. मोतीराज राठोड याच्या कपाळा-वर अभी प्रत्यक्ष जखम लहानपणी झाली.
दारूची भट्टी लावली म्हणून त्यांच्या काकांना पोलीस बेदम मारहाण करीत होते. या मारहाणीत त्यांचा जीव जाऊ नये म्हणून बाडीने (आईने) चिमुकल्या मोतीराज ला करकाच्या अंगावर टाकून दिले. अशात एक फटका मोतीराजला डोक्याबार बज़ला आणि ‘गुन्हेगारी’ च्या त्या जखमेची खूण राठोडांच्या कपाळावर कायम राहिलो, त्या व्यक्तिगत आणि सामाजिक जखमेने उकारन करण्यासाठी मोतीराज राठोड पुढे आपले आयुष्य वेचतात, त्यांची ही जीवनयात्रा त्यांनी ‘मी एक गुन्हेगार या अलीकडेच प्रकाशित झालेल्या राजकीय स्वकथनात राब्दबद्ध केली आहे.
गुन्ह्याची परिभाषा ब्रिटीश काळात कायद्याने गुन्हेगार उरवलेल्या बंजारा जमातीत मोतीराज राठोड यांचा जन्म झाला ‘बोरून नेले सारे गात्र, दारी लामाणाचे नाब’ असे अनुभब बालपणापासून राठोडांना आले होते. कुठेही चोरी झाली की पोलीस लमाण ताड्यावर यायचे आणि संशयित आरोपी म्हणून सर्वांची सड़ती घेतल्यावर, तपासाच्या दरम्यान निर्दयीपगा आणि क्रूरतेचा मनमानी खेळ करायचे, बायांच्या लेंग्यामध्ये बैडकोळी, पाल सोडून, तर कधी अश्लील चाळे करून कोणाचेतरी नाव वदवून घेतले जाई. हातभट्टीची दारू लावण्याचा ‘गुन्हा’ केलेल्या राठोडांच्या वडिलांना तुरुंगवास झाला तेव्हा बहिणीचा भूकबळी गेला.
एका ‘गुन्हेगार जगाती’त त्यांचा जम झाला होता. या ‘गुन्हेगारीचे स्माटन करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर चळवळ केली, मनुष्यत्वावर दावा ठोकला, भतक्या विमुक्तांच्या अत्थानासाठी राजकीय – सामाजिक प्रचोधन केले. व्यवस्थेच्या लेखी हे सर्व गुन्हे ठरतात; या सर्व गुन्ह्यांची हकीकत त्यांनी दहा भागांमध्ये वा पुस्तकात दिली आहे. गुन्हेगारीचा कलंक दूर करण्यावा, सामाजिक जाणि आर्थिक लोकशाही हक्कांसाठी जे वैचारिक आणि राजकीय कर्तेपण राठोड आणि त्यांच्यामोचनच्या लोकांनी दाखवले ते आपल्या रोजनिशीत नियमित नोंदवत असत. या रोजनिशीतील नोंदी संपादित करून प्रदीप खेतमर यानी नहर राजकीय कथन साकारले आहे.
फुले-आंबेडकरी भूमिदृष्टी साठ आणि सत्तरचे दशक जगभरात राजकीय परिवर्तनाचा आणि लोकशाहीविषयक नवनवीन सिद्धांन आणि लोकचळवळींचा काळ होता. महाराष्ट्रात याच काळात फुले जआंबेडकरी विचार जाणि जगभरातील विविध तत्वज्ञानांरी नात सांगणाऱ्या दलित पँचर्यसारख्या संघटना उदयाला आल्या होत्या, जातीअंताची आंबेडकरी बळबळ आणि सामाजिक आर्थिक विषमतांना वाचा फोडणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या राजकीय संघटनाचा हा कालखंड. ‘सामाजिक उत्थानासाठी लिहन चळवळीचे नेतृत्व करण्याचे मी दलित पँथर्स कडून शिकलो’ अशी ग्वाही लेखक देतत.
त्यांचा हा प्रवास सुरु झाला तो औरंगाबाद शहरातील नागसेन वनातून नागसेनवनात आंबेडन्नी साहित्य, मिलिंद महाविद्यालय विद्यार्थी नियतकालिक, अनियतकालिक, नामांतर लहा, आणि मराठी वैचारिक आणि साहित्यिक विश्वातील दीपस्तंभ ‘अस्मितादर्श’ असे सूजन घडले. आंबेडकरोत्तर महाराष्ट्रातील महनम संघर्ष आणि सृजनभूमी म्हणजे नागसेनवन परेसर, मोतीराज राठोड तांड्यातील लोकांनी केलेल्या लोकवर्गणीतून मिलिंद महाविद्यालयापर्यंत धडकतात. पुढे नाका कारखुनाची नोकरी करून पदवीचे शिक्षणही पेतात. बाचनातून आणि सानजिक चळवळीच्या प्रवेशातून त्यांची भूमिदृष्टी पडते त्यांच्या राजकीय कार्याची सुरुवात बंजारा गुबक आघाडीची स्थापना करून (१९७४) कातात.
पाच काळात मराठवाडा विद्यापीठ नामांतर लदा सुरु झाला होता. राठोड त्या काळात बंजारा वसतिगृहाचे अध्यक्ष म्हणून काम बघत होते. तिथेच त्यांनी नामांत्र कार्यालय अशी पाटी लाउन काम सुरु केल्याबर कार्यकारणी रादायांकडून बिरोध झाल्याने ती पाटी उचलून आपल्या गरी लावली आणि नामांतर कार्यालय सुरु केले. महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते, नामांतरवादी कृती समितीचे सदस्य आणि आंबेडकरी जनतेचा वावर त्यांच्या घरी असे, राठोड आणि त्यांच्या सहकार्यांनी हजारो भक्या विमुक्तांना नामांतर आंदोलनाशी जोडले. इथून पुढे खन्या अधनि त्यांची दृष्टी अधिक व्यापक झाल्याचे लेखक नोंदवतात.
लोक चळवळी : १९८१ च्या दरम्यान मंडल आयोगाच्या शिफारसी जाहीर झाल्या तेन्हा मोतीराज राठोड दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जे.एन.यू) हिंदी माहित्यातून एम. फील करत होते बंजारा लोकसंस्कृतीक त्यांनी आपला प्रबंध लिहिला. तांड्यात वरू पाडगाऱ्या एन्ना लमाणाने ज्ञानाच्या क्षेत्रात घेतलेली ही उंब भरारी होती, जे. एन. यु. स्थापन झाल्यापासून एका वर्षातच एम. फिल. संपवणारे राठोड हे पहिलेच विद्यार्थी उरले. दरम्यान औरंगाबादच्या बांतराब नाईक कॉलेज मध्ये प्रध्यापाकी करता करता त्यांनी ‘मंडल आयोग कार्यवाही कृती समितीची स्थापाना केली.
समितीने राज्यभर मेळावे करत मदल आयोगासबंधी उनप्रबोधन मोहीम हाती घेतली. भटक्या विमुक्तांची उत्पिडीत अवस्थेतून मुक्ती करण्यासाठी कृतिकार्यक्रन त्यांनी हाती घेतले. भटक्यांची पालं जिथं थांबतात त्यांना तिथेच स्थिर होण्याचे आवाहान करणे, गायरान जमिनी ताब्यात घेणे, त्यांच्या पर्यायी उपजीविकेची सोय करणे, शसनदरबारी जमीन आणि लघुउद्योगसाठी सतत बकिली करणे अशी धडपड न्यांनी सातत्याने केली. सत्ता रुंदीकरणात जडीबुटी विकणाऱ्या वैटू जमातीचे पाल उपवस्त करण्यात आले तेव्हा त्यांनी ‘संतार चालू, रस्ता बंद’ असे आंदोलन केले. अशा अनेक पुनर्वसन आंदोलनाच्या नोंदी पुस्तकात येतान, गयरान जमीन अतिक्रमगातून हजारो भटक्यांना स्थिर करून त्यांना शेतकरी बनविण्याचे काम आपल्या संघटनेच्याबळावर त्यांनी केले.
एव्य प्रसंगातून वा लढ्याची प्रेरणा लक्षात येते, गेवराई येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या भटक्यांना जमिनीच्या मालकी हकाचे प्रमाणपत्र मिळवून दिल्यावर एका सापवाल्याने पळ्यात माष टाकून त्यांचे अभिनंदन केले, याप्रसंगी ‘एवढ्या मोतथा खडप्राय देशात दहा फुट बाय दहा फुटाचीही मालकीची जागा नसतांना आपण देशावर पिढ्यानपिढ्या प्रेम केले आहे, आज आपण गावकरी झालो आहोत, भविष्यात एक दिवस शेतकरी होऊ’ लाखोंमध्ये संख्या असणाऱ्या भटक्या विमुक्त जमातींचा ‘एक व्यक्ती, एक मूल्य’ बनण्यासाठीचा हा संघर्ष हा त्यांच्या ‘भारतीय भटके विमुक्त युथ फ्रंट’नी चालविल्या आंदोलनांतून प्रदर्शित होतो.
व्यवस्थात्मक हिंसेच्या विरोधात बंड संशयित गुन्हेगार म्हणून पोलिस आणि गावगुंड भटक्यांचा छळ करत असत, ढोकी हत्याकांडासारख्या अनेक घटना त्या काळात घडत होत्या. अशा भटक्यांसाठी अन्याय निवारण केंद्रच राठोड यांनी आपल्या घरी उघडले. अत्याचार झालेल्या घटनास्थळी जाणे पुरावे गोळा करणे, हस्तक्षेप करून निर्दोष भटक्यांची सुटका करणे, हिंसेसंबंधी सतत न्यायालयीन पाठपुरावा करणे असा त्यांचा ठरलेला दिनक्रम.
डोंगऱ्या पारधी नावाच्या माणसाला पोलिसांनी बेदम मारहाण केली आणि शेवटी दवाखान्यात त्याचा मृत्यू झाला, हा खटला त्यांनी लाऊन धरला, या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल ला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली, या प्रातिनिधिक केस मधून गतानुगतिक हिंसा, त्याविषयी बहुसंख्य लोकांची एकाप्रकारची मूकसंमती यांचा उलगडा वाचकांना होतो. गुन्हेगार असल्याच्या संशयावरून भटक्यांचा होणारा छळ, हजेरी पद्धत, आणि पोलिसांच्या ट्रेनिंग अभ्यासक्रमात भटक्यांच्या विषयी पूर्वग्रह अशा मुद्यांना घेऊन भटक्या विमुक्तांचा एक मोर्चा मोतीराज राठोड आणि सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई हायकोर्ट समोर एप्रिल १९८८ रोजी निघाला.
डोंबारी, वासुदेव, बहुरूपी, कुडमुडे जोशी, वैदू, नंदीबैलवाले, अस्वलवाले, माकडवाले, सापवाले असे अनेक भटके समूह मुंबईत दाखल झाले. हजारो भटक्यांनी हे लक्षवेधी आंदोलन केले. या आंदोलनातील उपक्रमशीलता, त्यातील कार्यकर्त्यांची मेहनत यांचे तपशीलवार वर्णन लेखक करतात. या आंदोलनात त्यांनी पुढे ‘जमीन जुमला दखलपात्र’ आंदोलनाची घोषणा करत त्यांच्या ‘भटक्या विमुक्तांचा जाहीरनामा’ या मुलभूत ग्रंथाचे चौपाटीवरच प्रकाशन करण्यात आले. त्यांनी या संबंधी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यावर अंतरिम निवाडा आला भटक्यांना कुठलाही पुरावा नसताना अटक करता येणार नाही, हजेरी पद्धत रद्द, पोलीस ट्रेनिंग मधील तो पूर्वग्रहदुषित भाग वगळावा. या आदेशाची नक्कल फ्रेम करून भटक्यांनी आपल्या झोपड्या आणि पालावर लावल्याचे लेखक नोंदवतात.
प्रतिकाराच्या अभिनव वाटा सदर राजकीय रोजनिशीची जमेची बाजू म्हणजे, एरवी ज्यांच्या कर्तेपणाची नोंद आपल्याला कुठल्याही अभिलेखागारात सापडणार नाही अशा रंगुबाई काळे, सुंदराबाई वडार, रेश्माबाई फासे पारधी अशा अनेक स्त्री पुरुषांचे कर्तुत्व अधोरेखित करायला लेखक विसरत नाहीत. ‘तुरुंग हेच आमचे घर आंदोलनात आपल्या जानावारांसाहित नाशिक तुरुंगात भटक्यांनी शिरकाव केला, वास्तव्य आणि कसण्यासाठी जमिनी मिळाव्या यासाठी ते आंदोलन होते, बेड्या आणि झोळीचे दहन करून, ‘धंदा परिवर्तन समाज परिवर्तन’ असे आंदोलन त्यांनी केले भटक्यांच्या नागरी जीवनाच्या आकांक्षा नेमकेपणाने यात अधोरेखित झाल्या.
भटक्या विमुक्तांवर अतिशय सघन लेखन राठोड यांनी केलं आहे, एक्स गुन्हेगार जमाती, भटक्या विमुक्तांचा जाहीरनामा, तांडा संस्कृती, पाल निवासी अशी छोटीमोठी किमान वीसेक पुस्तकं त्यांनी लिहिली. याशिवाय आंदोलनादरम्यान संबंधित जमातीची माहिती घेऊन त्यावर सविस्तर लेख लिहणे हा त्यांचा नित्याचा उपक्रम होता. दैनिक मराठवाडा, विमुक्त विचार, अशा पुण्या-मुंबई केन्द्री अभ्यासाने कंसात ढकलेल्या नियतकालिके, वृत्तपत्रे आणि मासिकांमधून त्यांनी केले, त्यांचा लेखसंग्रह म्हणजे मानवशास्त्रीय निरीक्षणांचा चा उत्तम नमुना आहे. पत्नी कला राठोड आणि औरंगाबाद शहरातील प्रागतिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते आणि नेते यांच्या कर्तेपणाचे दाखले या रोजनिशीच्या प्रत्येक पानावार आहेत हे विशेषत्वाने नोंदविले पाहिजे. भारतीय राज्यघटनेने दिलेले अभिवचन सामाजिक आणि आर्थिक पातळीवर नाकारला जाते, त्या नाकारला दिलेला नकार हा या ‘मुक्ती ‘कथनाचा गाभा आहे.
पुस्तकाचे नाव : मी एक गुन्हेगार
लेखक: मोतीराज राठोड, संपादन प्रदीप खेतमर गोल्डन पेज पब्लिकेशन, किंमत ४२५, पृष्ठसंख्या: ३५२
IND vs ENG: लॉर्ड्सवरील चेंडू बदल वाद चिघळला; भारताची आयसीसीकडे तक्रार, पंचांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत लॉर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेंडू बदलण्यावरून मोठा वाद निर्माण...
Read moreDetails