Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

देवघरमध्ये भीषण अपघात: १९ कावडियांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

mosami kewat by mosami kewat
July 29, 2025
in बातमी
0
देवघरमध्ये भीषण अपघात: १९ कावडियांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

देवघरमध्ये भीषण अपघात: १९ कावडियांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

झारखंड : झारखंडमधील देवघर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. मंगळवारी पहाटे गोड्डा-देवघर मार्गावर, मोहनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कावडियांना घेऊन जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या या बसने समोरून येणाऱ्या गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. पहाटे साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत १९ कावडियांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
‎
‎या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर मदतकार्य सुरू झाले, मात्र अपघात जंगलमय भागात झाल्याने बचावकार्यात अनेक अडथळे येत होते.
‎अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात अनेक कावडी गंभीर जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
‎
‎जिल्हा प्रशासनाने तातडीने जवळच्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळू शकेल. सध्या श्रावणी मेळ्यामुळे झारखंडमधील प्रसिद्ध बाबा बैद्यनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमधून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असताना हा अपघात झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Tags: accidentDeogharjharkhand
Previous Post

मंगळवेढ्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारिणीसाठी मुलाखती; अनेक तरुणांचा पक्षात प्रवेश

Next Post

महाराष्ट्रात पावसाचा जोर घटणार; विदर्भात मात्र ‘यलो अलर्ट’ कायम!

Next Post
महाराष्ट्रात पावसाचा जोर घटणार; विदर्भात मात्र 'यलो अलर्ट' कायम!

महाराष्ट्रात पावसाचा जोर घटणार; विदर्भात मात्र 'यलो अलर्ट' कायम!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home