हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत (PMKSY) झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने (VBA) हिंगोली येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर ‘थाळी बजावो’ आंदोलन केले. दीड वर्षांपासून तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने, १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत चौकशी अहवाल सादर करून दोषींवर कारवाई न झाल्यास पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
कळमनुरी तालुक्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत ठिबक आणि तुषार सिंचन योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप आहे. एकाच वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी दाखवणे, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सारखेच CM/L नंबर आणि बॅच नंबर वापरून शेतकऱ्यांची फसवणूक करणे, असे गैरव्यवहार झाल्याचा ठपका वंचित बहुजन आघाडीने ठेवला आहे. दीड वर्षांपूर्वी या संदर्भात तक्रार देऊनही प्रशासनाकडून कोणतीही चौकशी किंवा कारवाई न झाल्याने हे आंदोलन करण्यात आले.
२९ सदस्यीय समिती गठीत; १०० टक्के तपासणीचे आश्वासन
आंदोलनानंतर जिल्हा कृषी अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी २९ सदस्यीय समिती गठीत करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. ही समिती कळमनुरी तालुक्यातील संपूर्ण प्रकरणाची १०० टक्के ‘जायमोका’ तपासणी करून कारवाई करेल, असे आश्वासनही देण्यात आले. कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
१५ ऑगस्ट २०२५ अंतिम मुदत
वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे की, जर १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत या गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होऊन दोषींवर कारवाई झाली नाही, तर पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल. या आंदोलनामुळे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव ज्योतिपाल रणवीर, योगेश नरवाडे, राजकुमार इंगोले, सिद्धोधन गायकवाड, निखिल कव्हाने, यशवंत नरवाडे, संतोष इंगोले, जयभीम डोंगरे, रोहन पंडित, शकील पठाण, मोहम्मद अस्लमभाई, अक्षय इंगोले, काशिनाथ साळवे, अमोल खंदारे, कान्हेगाव शा.अ. धम्मपाल पाईकराव, आडा शा.अ. विनोद ढेपे, बऊर शा.स. दादाराव खंदारे, मुकिंदा ढेपे, अमोल पुंडगे, सामाजिक कार्यकर्ते नचिकेत वाढवे, दिनेश पाईकराव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध
खामगाव : गाय चोरीच्या आरोपावरून एका बौद्ध तरुणाला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ खामगावात बौद्ध समाजाने आज वंचित बहुजन...
Read moreDetails