ओडिशा : ओडिशा दक्षता विभागाने कोरापूत जिल्ह्यातील जयपूर वनपरिक्षेत्रात (फॉरेस्ट रेंज) कार्यरत असलेले उपवनरक्षक (डेप्युटी रेंजर) रामचंद्र नेपाक यांच्या सहा मालमत्तांवर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली आहे. नेपाक अवघ्या पाच महिन्यांत सेवानिवृत्त होणार होते, त्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली आहे.
छाप्यादरम्यान, जयपूर शहरातील नेपाक यांच्या एका फ्लॅटमधील गुप्त तिजोरीत तब्बल १.४३ कोटी रुपयांची रोकड, सोन्याची बिस्किटे आणि सोन्याची नाणी सापडली आहेत, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय, १.३२ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी (FDs), दीड किलो सोने आणि साडेचार किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.
नेपाक यांच्या मालकीची अनेक स्थावर मालमत्ताही उघड झाली आहे. यामध्ये जयपूरमध्ये ३६०० चौरस फुटांची तीन मजली इमारत, भुवनेश्वरमध्ये एक ३ बीएचके फ्लॅट, आणि जयपूर शहरात दोन फ्लॅट तसेच दोन भूखंड (प्लॉट) यांचा समावेश आहे.
सध्या दक्षता विभागाकडून जप्त करण्यात आलेली रोकड, सोने, चांदी आणि इतर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. सोने, चांदी आणि इतर मालमत्तेचे मूल्यांकन करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दक्षता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असून, आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या मोठ्या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध
खामगाव : गाय चोरीच्या आरोपावरून एका बौद्ध तरुणाला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ खामगावात बौद्ध समाजाने आज वंचित बहुजन...
Read moreDetails