मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वातावरणात उष्णता आणि दमटपणा वाढला आहे, ज्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई आणि उपनगरांत आज सकाळपासूनच आकाश ढगांनी भरून आले असून, दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दमट हवेमुळे उष्णतेची लाट अधिक तीव्र जाणवत आहे. मुंबईत आज कमाल तापमान सुमारे ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद
मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरातील अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. सबवेमध्ये २ ते ३ फूट पाणी साचल्याने वाहतुकीसाठी तो तात्पुरता बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड्स लावले असून, वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, जीवरक्षक आणि पाणी उपसण्याचे पंपही तैनात करण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे. आकाश ढगाळ असले तरी, मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडत असल्या तरी, दमट हवामानामुळे ग्रामीण आणि सखल भागांमध्ये उकाडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघरमध्ये आज कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन...
Read moreDetails