Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‎वंचित बहुजन आघाडीचा ‘महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयका’ला तीव्र विरोध

mosami kewat by mosami kewat
July 19, 2025
in बातमी
0
वंचित बहुजन आघाडीचा 'महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयका'ला तीव्र विरोध

वंचित बहुजन आघाडीचा 'महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयका'ला तीव्र विरोध

‎
निलंगा :
महाराष्ट्र विधानसभेत नुकत्याच मंजूर झालेल्या ‘महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयका’विरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप घेतला आहे. हे विधेयक दडपशाही आणि असंविधानिक असून नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे निलंगा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब बनसोडे यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी निलंगा येथील जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
‎
‎बनसोडे यांच्या मते, हे विधेयक स्पष्टपणे नागरिकांच्या असहमती व्यक्त करण्याच्या अधिकारावर गदा आणणारे आहे. निवेदनात म्हटले आहे की, विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करणे अपेक्षित होते, मात्र तसा प्रयत्न न झाल्याने हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले.
‎
‎वंचित बहुजन आघाडीने या विधेयकाला विरोध दर्शवला असून, जर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले, तर सरकारची धोरणे आणि निर्णयांविरुद्ध असहमती, निषेध, बंड किंवा विरोध व्यक्त करणाऱ्या नागरिक, संघटना, राजकीय पक्ष आणि धोरणकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्यास कायदेशीर मान्यता मिळेल, अशी भीती भाऊसाहेब बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
या विधेयकामुळे लोकशाही मूल्यांचे आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन होईल, असे वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे.

Tags: Maharashtra Jan Suraksha BillNilangavbaforindia
Previous Post

मुंबईत वंचित बहुजन आघाडीतर्फे वर्षावास निमित्त कार्यक्रमाचे आयोजन!

Next Post

शेकडो मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश: जिंतूरमध्ये पक्षप्रवेश सोहळा

Next Post
शेकडो मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश: जिंतूरमध्ये पक्षप्रवेश सोहळा

शेकडो मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश: जिंतूरमध्ये पक्षप्रवेश सोहळा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पैठण पंचायत समितीत दिव्यांग कल्याण ५% सेस निधी योजना तात्काळ राबविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
बातमी

पैठण पंचायत समितीत दिव्यांग कल्याण ५% सेस निधी योजना तात्काळ राबविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

by Akash Shelar
May 21, 2026
0

पैठण : जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या “दिव्यांग कल्याण ५% सेस निधी...

Read moreDetails
खोट्या तक्रारीवर महिला शेतकऱ्यावर ३२ लाखांचा दंड; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

खोट्या तक्रारीवर महिला शेतकऱ्यावर ३२ लाखांचा दंड; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

May 21, 2026
पुणे तिथे गुन्हे : जुन्या वादातून रिक्षाचालकावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, तिन्ही आरोपी ताब्यात

पुणे तिथे गुन्हे : जुन्या वादातून रिक्षाचालकावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, तिन्ही आरोपी ताब्यात

May 19, 2026
गुणवत्तेचा खून करणारे कोण : आरक्षणवादी की भ्रष्ट दलाल?

गुणवत्तेचा खून करणारे कोण : आरक्षणवादी की भ्रष्ट दलाल?

May 19, 2026
बौद्ध समाजाची जात नोंदणी: वैचारिक पराभव की संवैधानिक अपरिहार्यता?

बौद्ध समाजाची जात नोंदणी: वैचारिक पराभव की संवैधानिक अपरिहार्यता?

May 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home