Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बाळाला दत्तक घेतल्याने खळबळ, ७ जणांवर गुन्हा दाखल ‎

mosami kewat by mosami kewat
July 18, 2025
in बातमी
0
१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बाळाला दत्तक घेतल्याने खळबळ, ७ जणांवर गुन्हा दाखल ‎

१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बाळाला दत्तक घेतल्याने खळबळ, ७ जणांवर गुन्हा दाखल ‎

       

‎भंडारा : अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बेकायदेशीरपणे दत्तक घेतल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाईल्ड हेल्पलाईनला ७,००० रुपयांमध्ये बाळाची विक्री झाल्याची तक्रार मिळाली होती, त्यानंतर हे रॅकेट समोर आले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी केलेल्या तपासात ही बाब समोर आली असून, याप्रकरणी सात जणांविरुद्ध Juvenile Justice (Care and Protection of Children) Act, २०१५ च्या कलम ८० आणि ८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‎ ‎

मिळालेल्या माहितीनुसार, चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर बाळाच्या विक्रीची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या आधारे चाईल्ड हेल्पलाईन, भंडारा येथील कर्मचाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली असता, बालकाला दत्तक दिल्याचे समोर आले. ‎ ‎जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी अधिक पुरावे गोळा केले असता, धक्कादायक तपशील समोर आला. साकोली तालुक्यातील एका उपकेंद्रात एप्रिल २०२४ मध्ये जन्मलेल्या एका १५ दिवसांच्या बाळाला १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘दत्तक’ म्हणून देण्यात आले होते. विशेष म्हणजे, दत्तक घेणाऱ्या पालकांनी बेकायदेशीर मार्ग अवलंबत भंडारा शहरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयात प्रसूती झाल्याचे बनावट कागदपत्रे दाखवून नगर परिषद, भंडारा येथून नवीन जन्म प्रमाणपत्र देखील मिळवले होते. ‎ ‎

या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाशिवाय, केवळ आपापसात संगनमत करून बेकायदेशीररित्या बाळाला दत्तक घेण्यात आले होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत नितीनकुमार साठवणे यांनी साकोली पोलिस स्टेशनमध्ये राजपाल हरीचंद रंगारी (४७), सुचिता हरीचंद रंगारी (४४, दोघे रा. हसारा ता. तुमसर), अजित पतीराम टेभुर्णे (३५), सोनाली अजित टेंभुर्णे (२५), नंदकिशोर मेश्राम (४५), राकेश पतीराम टेभुर्णे (३२) आणि पुष्पलता दिलीप रामटेके (५०, सर्व रा. घानोड ता. साकोली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‎ ‎

सहाय्यक आयुक्त योगेश जवादे, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरुण बांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बाल कल्याण समिती अध्यक्ष सानिका वडनेरकर, सदस्य मृणाल बांडेबुचे, महेश सातव, मेघा खोब्रागडे यांच्या सहकार्याने चाईल्ड हेल्पलाईन समन्वयक लोकप्रिया देशभ्रतार, विजय रामटेके, विक्की सेलोटे आणि सुनील राने यांनी हे प्रकरण उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.


       
Tags: adoptionbhandaraChildscandal
Previous Post

प्रा. किसन चव्हाण यांना दंगलीत अडकवण्याचा पोलिसांचा चेहरा उघड; शेवगावचे तत्कालीनपीआय विलास पुजारीच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

Next Post

‎महाराष्ट्रात २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती

Next Post
‎महाराष्ट्रात २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती

‎महाराष्ट्रात २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कर्जबाजारी शेतकरी आत्महत्याप्रकरणी पीडित कुटुंबाला मदत व नोकरी द्यावी – वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी‎‎‎‎
बातमी

कर्जबाजारी शेतकरी आत्महत्याप्रकरणी पीडित कुटुंबाला मदत व नोकरी द्यावी – वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी‎‎‎‎

by mosami kewat
September 1, 2025
0

अहमदनगर : कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या नेवासा तालुक्यातील वडगाव येथील शेतकरी कुटुंबाला तातडीने मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली...

Read moreDetails
सोमनाथ सूर्यवंशीचा लढा देत असल्याबद्दल ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे सलगरे ग्रामपंचायतीकडून अभिनंदनाचा ठराव !

सोमनाथ सूर्यवंशीचा लढा देत असल्याबद्दल ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे सलगरे ग्रामपंचायतीकडून अभिनंदनाचा ठराव !

September 1, 2025
नांदेड शहरातील दोंदे मळ्यातील रस्त्याची दुरवस्था, वंचित बहुजन युवक आघाडीचा आंदोलनाचा इशारा

नाशिक शहरातील दोंदे मळ्यातील रस्त्याची दुरवस्था, वंचित बहुजन युवक आघाडीचा आंदोलनाचा इशारा

September 1, 2025
म्हाडा लॉटरी : औरंगाबादमध्ये घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली! ‎ ‎

म्हाडा लॉटरी : औरंगाबादमध्ये घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली! ‎ ‎

September 1, 2025
Afghanistan earthquake : भूकंपाने अफगाणिस्तान हादरले, ६०० हून अधिक बळी, शेकडो जखमी

Afghanistan Earthquake : भूकंपाने अफगाणिस्तान हादरले, ६०० हून अधिक बळी, शेकडो जखमी

September 1, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home