साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या सांगता मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, अशी लेखी मागणी वंचित बहुजन आघाडी सोलापूर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाज बांधव व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन मिरवणूक पाहतात. या मिरवणुकीत अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावरील घडामोडी, त्यांनी लिहिलेले साहित्य, प्रबोधनात्मक देखावे सादर केले जातात. त्यामुळे या मिरवणुकीला मोठे स्वरूप प्राप्त होते आणि समाजातील प्रबोधनात्मक कार्य घडते.
त्यामुळे ही मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत शांततेत पार पडावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, मातंग समाजातील युवा नेते, शहर प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब रणदिवे, महासचिव विनोद इंगळे, उपाध्यक्ष रोहित लालसरे, विक्रांत गायकवाड, श्रीनिवास सांगेपाग, रवी म्हेत्रे, मल्लिकार्जुन हिरेमठ, शरीफ शेख, शाहिद शेख आदी उपस्थित होते.