Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबई: मालाडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून अभियंत्याचा मृत्यू

mosami kewat by mosami kewat
July 16, 2025
in बातमी
0
मुंबई: मालाडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून अभियंत्याचा मृत्यू

मुंबई: मालाडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून अभियंत्याचा मृत्यू

मुंबई : मालाड पश्चिम येथील वळणाई परिसरात ७ जुलै रोजी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून पडून २४ वर्षीय अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ओमकार संख्ये असे मृताचे नाव असून, त्यांच्या वडिलांनी विकासकाच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा जीव गेल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार संख्ये हा श्रीजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या विकासकासोबत श्री वैतीविनायक मंगलम एसआरए सोसायटीमध्ये कनिष्ठ साइट इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. ७ जुलै रोजी ओमकार इमारतीच्या दहाव्या मजल्यावर कामाची पाहणी करत असताना, तो सहाव्या मजल्याच्या स्लॅबवर कोसळला. या घटनेत ओमकारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ओमकारचे वडील विनोद संख्ये (६४) यांनी मालाड पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, विकासकाने कामगार आणि साइट अभियंत्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली सुरक्षा जाळी, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट किंवा इतर कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती. तसेच, ज्या ठिकाणी ओमकार काम करत होता, तिथे लोखंडी वॉकवे जाळी स्लॅबवर योग्यरित्या न बसवता कोणत्याही आधाराशिवाय एका बाजूने ठेवण्यात आली होती, ज्यामुळे हा अपघात घडला. विकासकाच्या या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलाचा जीव गेल्याचे विनोद संख्ये यांनी म्हटले आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

Tags: Engineermaladmumbai
Previous Post

जलजीवन मिशन भ्रष्टाचार, चोराच्या हातात चौकशी कशी? – राजेंद्र पातोडे

Next Post

आंबेनळी घाट अवजड वाहतुकीसाठी १५ ऑगस्टपर्यंत बंद; दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच

Next Post
आंबेनळी घाट अवजड वाहतुकीसाठी १५ ऑगस्टपर्यंत बंद; दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच

आंबेनळी घाट अवजड वाहतुकीसाठी १५ ऑगस्टपर्यंत बंद; दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा भयावह आकडा: साडेसहा महिन्यांत ५४३ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
बातमी

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा भयावह आकडा: साडेसहा महिन्यांत ५४३ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

by mosami kewat
July 17, 2025
0

‎‎औरंगाबाद : कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीमुळे मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात असून, गेल्या साडेसहा महिन्यांत (१ जानेवारी ते ११...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीचा आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेना आणि शिवसेना युतीला पाठिंबा नाही!

वंचित बहुजन आघाडीचा आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेना आणि शिवसेना युतीला पाठिंबा नाही!

July 17, 2025
जन सुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन

जन सुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन

July 17, 2025
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण; न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन - वंचित बहुजन आघाडी कडून गंभीर आरोप

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण; न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन – वंचित बहुजन आघाडी कडून गंभीर आरोप

July 16, 2025
नोकरीच्या आमिषाने २ तरुणींची ३० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

नोकरीच्या आमिषाने २ तरुणींची ३० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

July 16, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home