Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कोकणात पावसाचा हाहाकार; नद्या दुथडी भरून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

mosami kewat by mosami kewat
July 16, 2025
in बातमी
0
कोकणात पावसाचा हाहाकार; नद्या दुथडी भरून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोकणात पावसाचा हाहाकार; नद्या दुथडी भरून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

       

कोकण : कोकणात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी अनेक ठिकाणी पूर आले.

रायगडमध्ये ‘रेड अलर्ट’

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक असून, सावित्री, आंबा, आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. महाड शहराला सावित्री नदीच्या पाण्याने वेढले असून, रावढळ पुलावरून पाणी वाहत असल्याने महाड-रायगड दस्तुरी मार्ग बंद करण्यात आला आहे. नागठाणे येथील बस स्थानकात पाणी शिरल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही पूरस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हाहाकार माजवला असून, जगबुडी, कोदवली, आणि शास्त्री नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे रत्नागिरीतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. सिंधुदुर्ग परिसरातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. संगमेश्वर, देवरुख, साखरपा, लांजा, आणि राजापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. संगमेश्वर येथे डोंगराचा भाग रस्त्यावर येत असल्याने वाहनचालकांना सिंधुदुर्गकडे जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

वाहतूक विस्कळीत, घरांमध्ये शिरले पाणी

रोहे शहर, आंबेवाडी नाका आणि कोलाड नाक्यावर पाणी शिरल्याने दुकानदारांची तारांबळ उडाली आहे. रोहा-नागोठणे मार्गावरील भिसेखिंड येथे दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. आंबेनळी घाटातील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. म्हसळा येथे १३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

या गंभीर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पूरप्रवण भागात न जाणे, बचाव यंत्रणांशी संपर्क साधून अद्ययावत माहिती घेणे, तसेच तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे.


       
Tags: kokanMaharashtraMonsoonRaigadrainratnagiri
Previous Post

“Nalasopara Crime News: लायसन्स नसलेल्या बापलेकांकडून वाहतूक पोलिसांना रस्त्यातच लाथाबुक्यांनी मारहाण!”

Next Post

Pune News : पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात खळबळ, तब्बल 15 प्राणी दगावले

Next Post
Pune News : पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात खळबळ, तब्बल 15 प्राणी दगावले

Pune News : पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात खळबळ, तब्बल 15 प्राणी दगावले

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Anil Ambani : अनिल अंबानी ईडीच्या चौकशीला सामोरे; १७,००० कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी हजर
Uncategorized

Anil Ambani : येस बँकेला हजारो कोटींचा फटका; अनिल अंबानींसह अनेकांवर आरोपपत्र दाखल

by mosami kewat
September 19, 2025
0

मुंबई : येस बँक फसवणूक प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांनी आपली कारवाई तीव्र केली आहे. सुमारे 2,800 कोटी रुपयांच्या कथित बँक...

Read moreDetails
परभणी शहरातील जिंतूर रोडवर गतिरोधक बसविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी!

परभणी शहरातील जिंतूर रोडवर गतिरोधक बसविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी!

September 19, 2025
Akola Protest :  शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबा

Akola Protest : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबा

September 19, 2025
Parbhani : पूर्णा तालुक्यात रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीत

Parbhani : पूर्णा तालुक्यात रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीत

September 19, 2025
जीत सोनेकरच्या मारेकऱ्यांना फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जीत सोनेकरच्या मारेकऱ्यांना फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

September 19, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home