मुंबई : राज्यातील विनाअनुदानीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या न्याय्य मागण्यासाठी आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सचिव व माजी आमदार सय्यद नतीकोद्दीन खतीब तसेच राष्ट्रीय खजिनदार महेश भारतीय, माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आज आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला व मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
यावेळी आंदोलकांनी शासनाकडून अनुदानाची मागणी तातडीने मान्य करावी व कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवण्यासाठी न्याय मिळावा, अशी मागणी केली. वंचित बहुजन आघाडीने या संघर्षात शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहून लढा देण्याचे आश्वासन दिले आहे.