अकोला : बोधगया येथे सुरू असलेल्या महाबोधी मुक्ती आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे येत्या 5 जुलै रोजी सहभागी होणार आहेत.
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अकोला वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रवाना झाले असून, बोधगया महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला ताकद देण्यासाठी ही उपस्थिती असणार आहे.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर यांनी आधीच भेट देऊन या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे.
आता यात सुजात आंबेडकर देखील सहभागी होत आहेत. बौद्ध समाजाच्या ऐतिहासिक हक्कासाठी चालू असलेल्या या लढ्याला अकोल्यातून पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत, अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
दुःखद! ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा
मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'मैं हूं ना', 'कल हो ना हो', 'ओम शांति ओम' अशा...
Read moreDetails





