सोलापूर : वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाचे माळशिरस तालुका युवक अध्यक्ष, तसेच वंचित बहुजन आघाडीचे (VBA) धडाडीचे कार्यकर्ते सुरज वाघंबरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या निधनाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. माळशिरस तालुक्यात त्यांनी अत्यंत तळमळीने आणि प्रामाणिकपणे काम केले. सोशल मीडियावर बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका परखडपणे मांडून वंचित बहुजन आघाडीचा प्रचार आणि प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने वंचित बहुजन आघाडीने एक महत्त्वाचा आणि सक्रिय कार्यकर्ता गमावला आहे. त्यांची उणीव कधीही भरून येणार नाही, अशा भावना वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याने व्यक्त केल्या आहेत. अकलूज येथे त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निफाड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची भव्य आढावा बैठक यशस्वीरीत्या पार पडली
नाशिक : वंचित बहुजन आघाडीची जि. नाशिक ता. निफाडची आढावा बैठक पिंपळगाव बसवंत येथील रुचा हॉटेल येथे जिल्हाध्यक्ष चेतनभाऊ गांगुर्डे...
Read moreDetails