Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Prakash Ambedkar : महाराष्ट्र 2024 विधानसभा निवडणुकीतील ७६ लाख रहस्यमय वाढलेल्या मतांवर सुनावणी पूर्ण!

mosami kewat by mosami kewat
June 24, 2025
in बातमी, राजकीय
0
Prakash Ambedkar : महाराष्ट्र 2024 विधानसभा निवडणुकीतील ७६ लाख रहस्यमय वाढलेल्या मतांवर सुनावणी पूर्ण!

Prakash Ambedkar : महाराष्ट्र 2024 विधानसभा निवडणुकीतील ७६ लाख रहस्यमय वाढलेल्या मतांवर सुनावणी पूर्ण!

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात मांडली बाजू : २५ जूनला निकाल

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र २०२४ विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चेतन अहिरे विरुद्ध भारतीय संघराज्य व इतर या प्रकरणात आज सुनावणी झाली.

यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २५ जून रोजी निकाल जाहीर केला जाईल असे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावर आपली तीव्र भूमिका मांडली आहे.

त्यांनी यापूर्वीही निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला होता. १६ जानेवारी २०२५ रोजी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व इतर विरोधी पक्षांना पत्र लिहून ईव्हीएम वापर तसेच १९६१ मधील निवडणूक नियमांत झालेल्या संशोधना विरोधात संयुक्त लढ्याचे आवाहन केले होते. परंतु, कोणत्याही राजकीय पक्षाने त्याला प्रतिसाद दिला नव्हता.

त्या नंतर स्वतः आंबेडकर यांनी कोर्टात हे प्रकरण घेऊन गेले. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी असेही नमूद केले होते की, ही ७६ लाख मतांची आकडेवारी फक्त ‘चूक’ नाही, तर ती निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर व लोकशाहीवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. याचिकाकर्ता चेतन अहिरे यांचा आरोप आहे की, मतदान संपल्यानंतर आकस्मिकरीत्या ७६ लाख मतांची नोंद झाली, जी पूर्वीच्या एकूण आकडेवारीशी जुळत नाही.

Tags: AssemblyElectionsMaharashtravote
Previous Post

Vanchit Bahujan Aghadi : 76 लाख मतांच्या रहस्यमय वाढीविरोधात सोलापूर येथे वंचितचा जनआक्रोश मोर्चा!

Next Post

Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकाला थोरला बाजीराव पेशवाचे नाव द्यावे; खासदार मेधा कुलकर्णी यांची अजब मागणी

Next Post
Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकाला थोरला बाजीराव पेशवे याचे नाव द्यावे; खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी

Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकाला थोरला बाजीराव पेशवाचे नाव द्यावे; खासदार मेधा कुलकर्णी यांची अजब मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ओडिशात सामाजिक विषमतेचा कळस: दलित स्वयंपाकीची नियुक्ती केल्याने पालकांचा अंगणवाडीवर बहिष्कार
बातमी

ओडिशात सामाजिक विषमतेचा कळस: दलित स्वयंपाकीची नियुक्ती केल्याने पालकांचा अंगणवाडीवर बहिष्कार

by mosami kewat
February 12, 2026
0

ओडिशा : एकीकडे देश प्रगती आणि समानतेच्या गप्पा मारत असताना, ओडिशामधील केंद्रपाडा जिल्ह्यातून सामाजिक विषमतेचे एक धक्कादायक चित्र समोर आले...

Read moreDetails
ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत दिनेश जाधव यांचा असंख्य समर्थकांसह ‘वंचित’मध्ये प्रवेश

ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत दिनेश जाधव यांचा असंख्य समर्थकांसह ‘वंचित’मध्ये प्रवेश

February 12, 2026
छत्रपती शिवाजी महाराज स्थापित स्वराज्याच्या लढ्यात महारांचे योगदान आणि हिंदुत्ववादी राजकारण

छत्रपती शिवाजी महाराज स्थापित स्वराज्याच्या लढ्यात महारांचे योगदान आणि हिंदुत्ववादी राजकारण

February 12, 2026
मोर्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

मोर्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

February 12, 2026
पिंपरी रेल्वे स्थानकाची दयनीय अवस्था: महिला प्रवाशांचे हाल; प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपरी रेल्वे स्थानकाची दयनीय अवस्था: महिला प्रवाशांचे हाल; प्रशासनाचे दुर्लक्ष

February 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home