पुणे – शहरात सुरु असलेल्या पावसाळ्याच्या तडाख्याने दोन दुर्दैवी घटना घडल्या असून, यामुळे प्रशासनाच्या पावसाळी तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कोल्हापूरहून पुण्यात आलेली एक महिला नवले पुलाजवळ रिक्षा पकडत असताना मुसळधार पावसामुळे अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. ही घटना शहरवासीयांच्या हृदयाचा ठाव घेणारी ठरली आहे. दोन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर तिचा मृतदेह वारजे भागातून सापडला. या घटनेमुळे पुण्यातील नाले, जलनियंत्रण यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरु झाली आहे. या घटनेच्या धक्क्यातून शहर सावरत असतानाच, पानशेत धरण परिसरात एक मुलगा पाण्यात बुडून मृत झाला आहे. या दोन्ही घटना पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनी पावसाळ्यात अत्यंत सावधगिरी बाळगावी, सार्वजनिक वाहतूक व जलस्रोताजवळ विनाकारण जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकोल्यात भव्य रक्तदान शिबिररक्तदात्यांनी रक्तदानातून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली
अकोला : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता पराग रामकृष्ण गवई मित्रपरिवार, एडवोकेट आकाश...
Read moreDetails






