Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वंचितची माढा लोकसभा विभाग आढावा बैठक

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 11, 2025
in बातमी
0
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वंचितची माढा लोकसभा विभाग आढावा बैठक
       

माढा : वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा विभाग सोलापुरच्यावतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक टेंभुर्णी (ता. माढा जि. सोलापुर) येथे पार पडली. आगामी काळात माढा, करमाळा, माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा सोलापुर जिल्हा समन्वयक डॉ. नितीनजी ढेपे व वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापुर जिल्हा निरीक्षक अमोल लांडगे उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढविण्याच्या अनुषंगाने माढा लोकसभा विभागातील पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. सदर बैठकीत समविचारी पक्षाशी युती करुन निवडणुक लढण्याचे व युती न झाल्यास वंचित बहुजन आघाडी माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला तालुक्यात स्वबळावर मोठ्या ताकदीने निवडणुक लढण्याचे आदेश डॉ नितीनजी ढेपे यांनी दिले. त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात घोंगडी बैठका आयोजित करुन निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सुचना करण्यात आल्या. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती गण व गटनिहाय पदाधिकारी कार्यकारण्या तसेच नगरपालिका व नगरपरिषदांच्या वॉर्ड कार्यकारण्या जाहीर करण्याच्या सुचना करण्यात आल्या.

यावेळी माढा लोकसभा विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण, सोलापुर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, महासचिव विशाल नवगिरे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओहळ, एम, बी कांबळे, लालासो मुलाणी, नौशाद शिकलकर, सुदेशना बडेकर, सत्यवान हांडे, जिल्हा संघटक जालिंदर गायकवाड, बाबा ओहळ, विलास कांबळे, अभिमान जगताप, राज वाघमारे,औदुंबर लेंगरे पाटील, रविंद्र कांबळे, विनोद ऊबाळे, स्वप्नील सावंत, प्रा. नवनाथ साळवे, सुरेश मोठे तसेच माढा लोकसभा विभागातील आजी, माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: againstbackdropdepriveddivisionElectionsLok SabhameetingReviewupcoming
Previous Post

रुग्णालयांनी अवैध गर्भाशय शस्त्रक्रिया केल्यास गय नाही – आरोग्य मंत्री

Next Post

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, 12 ते 16 जून मुसळधार पावसाची शक्यता

Next Post
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, 12 ते 16 जून मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, 12 ते 16 जून मुसळधार पावसाची शक्यता

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home