Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्पपेपरची मागणी नियमबाह्य – चंद्रशेखर बावनकुळे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 8, 2025
in बातमी
0
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्पपेपरची मागणी नियमबाह्य – चंद्रशेखर बावनकुळे
       
मुंबई – शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्पपेरची मागणी नियमबाह्य असल्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. या विषयी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी समाजमाध्यमातून माहिती दिली आहे. बावनकुळे यांनी म्हटले आहे की, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच न्यायालयासमोर दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर दोन महिन्यापूर्वीच रद्द करण्यात आले आहेत. आता कोणत्याही प्रतिज्ञापत्रासाठी कसलेही स्टॅम्प पेपर वापरण्याची आवश्यकता नाही. हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने सरकारने घेतला आहे.

परंतु, काही सरकारी कार्यालयातील ई-सेवा केंद्रांमधून विविध शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयीन प्रतिज्ञापत्रासाठी 100 व 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर स्टॅम्प पेपरची मागणी ही पूर्णतः नियमबाह्य व बेकायदेशीर आहे. याबाबत मी राज्यातील सर्वच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना पत्र जारी केले आहे.

वारंवार निर्देश देऊनही अशाप्रकारच्या बाबी जर निदर्शनास आल्या तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. हा निर्णय महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक, शेतकरी व सर्वच सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने घेतला आहे. जर कोणी सर्वसामान्य जनतेला अकारण वेठीस धरत असेल तर त्याला माफी नाही अशा प्रकारे त्यांनी नियमबाह्य व बेकायदेशीर स्टॅम्पपेपर मागणारांना सुनावले आहे.

Tags: affidavitscertificatesChandrashekhar Bawankuledemandeducationalillegalpaperstamp
Previous Post

अभिनेता डिनो मोरियासह 8 जणांना ईडीचे समन्स, मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरण

Next Post

छत्तीसगड बीजापूर जिल्ह्यातील चकमकीत 5 नक्षलवादी ठार

Next Post
छत्तीसगड बीजापूर जिल्ह्यातील चकमकीत 5 नक्षलवादी ठार

छत्तीसगड बीजापूर जिल्ह्यातील चकमकीत 5 नक्षलवादी ठार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न
बातमी

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

by mosami kewat
October 16, 2026
0

दक्षिण सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. सोमनाथ...

Read moreDetails
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home