मुंबई : ऐतिहासिक बौद्ध वारसा स्थळांची नासधूस करायची, हे घाणेरडी परंपरा या ठिकाणी आहे, त्याच परंपरेला पुढे नेत नागपूर येथे येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीचे विद्रुपीकरण करण्याचा घाट काही लोकांनी घातलेला आहे. त्याला नागपूरच्या स्थानिक बौद्ध जनतेने प्रखर विरुद्ध दर्शवला आहे. गेले अनेक महिन्यांपासून त्या विरोधात बैठका, निवेदने, मोर्चे, आंदोलने सुरू आहेत, मात्र ऐतिहासिक स्थळ असलेल्या दीक्षाभूमीच्या जागेवर अंडरग्राउंड पार्किंग बांधण्याचं काम थांबवण्यात येत नव्हते, आज जनतेचा कडेलोट झाला त्यांच्या भावनेचा उद्रेक झाला आणि जनतेने रस्त्या उतरून त्यांचा निषेध नोंदवला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी म्ह्टले आहे.
मोकळे यांनी म्ह्टले की,, हा इशारा आहे तिथल्या ट्रस्टींना आणि सत्तेत बसलेल्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना इथल्या बौद्ध जनतेच्या भावनांशी खेळू नका आमच्या ऐतिहासिक वारसा स्थळांना विद्रुप करण्याचं काम करू नका, अन्यथा ही जनता तुम्हाला रस्त्यावर उतरून धडा शिकवेल. आज त्याची झलक नागपूर मध्ये दिसली नागपूरची जनता रस्त्यावर उतरली आह, जर हे काम झालं नाही तर केवळ नागपूरच नाही तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जनता रस्त्यावर उतरेल आणि देशातीलही जनता रस्त्यावर उतरेल. त्यामुळे वेळीच हे काम थांबवण्यात यावं लोक भावनेचा आदर करण्यात यावा आणि पुन्हा अशा पद्धतीने बौद्ध वारसा स्थळांची नासधूस किंवा विद्रुपीकरण कोणी करू नये, हा इशारा जनतेने दिला आहे. तो सत्तेत बसणाऱ्यांनी समजून घ्यावा अन्यथा जनतेच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल.