वंचित बहुजन आघाडीचा शासनाच्या निर्णयाला विरोध
मुंबई : राज्य सरकारकडून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समर्थ रामदास यांचे ‘मनाचे श्लोक’ आणि ‘भगवद्गीते’तील श्लोकांचा समावेश केला जाणार आहे. तर भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी ‘मनुस्मृती’तील श्लोकाचा वापर केला जाणार आहे. यावर वंचित बहुजन आघाडीने विरोध दर्शविण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे ईशान्य मुंबई जिल्हा कोषाध्यक्ष शिवराम वाघमारे यांनी केले आहे.
वाघमारे म्हणाले की, शासनाने नव्या शैक्षणिक धोरणानुसार बनविलेल्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती तसेच इतर काही बाबींचा समावेश केला आहे. यावर सर्वांनी हरकती घ्यायच्या आहेत.