वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची जातीनिहाय यादी
मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरू आहे. अनेक राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने या निवडणुका लढवताना दिसत आहेत. मात्र, काही पक्ष निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने लोकशाहीचे सामाजिकीकरण करण्याच्या हेतूने सर्व जाती धर्मातील घटकांना उमेदवारी दिली आहे.
महविकास आघाडी आणि महायुती यांनी अल्पसंख्याक समुदायाला उमेदवारी दिलेली नाही. वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी देताना जातीचा समतोल साधलेला दिसतो. यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या या व्यापक भूमिकेमुळे त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकशाहीचे सामाजिकीकरण करण्याची घेतलेली व्यापक भूमिका आगामी काळातील राजकारणात एक पथदर्शी उपक्रम ठरणार असून, वंचित बहुजन समाजाला सत्तेत घेऊन जाण्यासाठी या पक्षाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
वंचित बहुजन आघाडीने दिलेले उमेदवार
मराठा – 04
ओबीसी – 10
अनु. जाती – 07
अनु. जमाती – 04
ब्राम्हण, सवर्ण – 02
मुस्लीम – 04
लिंगायत – 04