पुणे : गाव तिथे शाखाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये एकाच दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या 7 शाखांचे उद् घाटन करण्यात आले. पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष राज कुमार यांच्या हस्ते या शाखांचे उद् घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. राजगुरुनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शाखा उद् घाटन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
दोंदे, शिरोली, सिद्धेगव्हाण, शेलपिंपळगाव, कोयाळी, शेलगाव, वडगाव घेनंद या ठिकाणी वंचितच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रत्येक गावामधून ढोलताशाच्या गजरात रॅली काढण्यात आली. तसेच चौकात वंचित बहुजन आघाडीच्या नामफलकाचे उद् घाटन राज कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई भालेसाईन, पुणे जिल्हा महासचिव सतीश साळवे, उपाध्यक्ष रणजीत पाडळे, प्रबोधनकार सुधाकर अभंग, विश्वनाथ घोडके, बाळासाहेब मोरे, जावेद मोमीन, महेंद्र नाईक नवरे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन दत्ता सोनवणे यांनी केले. तुषार सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष सचिन साबळे, संपर्कप्रमुख ॲड. वैभव कांबळे, धीरज कांबळे, डॉ. देवेंद्र ओव्हाळ, सुनील वाकचौरे, भीमराव गायकवाड, जयवंत थोरात, संतोष हटाळे, संजय दुधावडे, दिनेश गोतारणे, रवींद्र रंधवे, अमोल कांबळे, सचिन गंगावणे, प्रेमदास भोसले, पी. के. पवार, दोंदे गाव शाखा अध्यक्ष विजय लगड, शिरोली शाखा अध्यक्ष अक्षय शिंदे, सिध्देगव्हाण शाखा अध्यक्ष नागसेन थोरात, शेलपिपळगाव अध्यक्ष आतिष गायकवाड, कोयाळी शाखा अध्यक्ष सुनील गंगावणे, वडगाव घेनद अध्यक्ष संतोष ओव्हाळ, रेश्मा सोनावणे, सुमन दुधावडे, मंगल थोरात, वैशाली सोनवणे, शीतल गंगावणे, शीतल थोरात, अलका थोरात, शुभांगी नितनवरे, सोनाली ओव्हाळ, सुवर्णा गायकवाड, आम्रपाली नितनवरे, प्रियांका गायकवाड, सोनाली गायकवाड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.