Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शालेय मुलांवरील हल्लाप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 18, 2024
in बातमी
0
शालेय मुलांवरील हल्लाप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करा
       

कोल्हापूर – गडमुडशिंगी ता. करवीर येथील बौद्ध समजातील शाळकरी मुलांना गावातील चौकातून तुम्ही जायचे नाही असे म्हणून अमानुष मारहाण करण्यात आली. तसेच चौकातून ये – जा करण्यास बंदी घालण्यात आली.

या प्रकरणामध्ये बौद्ध समाजातील चार मुले गंभीर जखमी झालेली असून, त्यांच्यावर गांधीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ४ आरोपीना अटक करण्यात आली असून, गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे. घटनास्थळी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांनी गांधीनगर सेवा रुग्णालयात जाऊन जखमी मुलांची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गांधीनगरमध्ये आल्याचे समजताच गांधीनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दीपक जाधव, डीवायएसपी सुजितकुमार क्षीरसागर हेही दाखल झाले. या वेळी सर्व आरोपींना तत्काळ अटक करून ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे  कोल्हापूर शहर महासचिव मल्हार शिर्के, जिल्हा उपाध्यक्ष भीमसेन राजमाने, करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी, करवीर सचिव अर्जुन गोंधळी, करवीर महासचिव विश्वास फरांडे, तानाजी काळे आदी उपस्थित होते. तसेच जिल्हा कोषाध्यक्ष विकास बाचणे , जिल्हा सह सचिव जयेश कांबळे, प्रताप तराळ, संतोष कांबळे, सुकुमार कांबळे, प्रवीण कांबळे, रवि कांबळे, भारत कांबळे, मनोज कांबळे, रमेश पोवार आदी उपस्थित होते.


       
Tags: kolapurMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अर्जूनवाड येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन

Next Post

बोरी येथे वंचितच्या शाखेचे उद्घाटन

Next Post
बोरी येथे वंचितच्या शाखेचे उद्घाटन

बोरी येथे वंचितच्या शाखेचे उद्घाटन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
बातमी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

by mosami kewat
September 23, 2026
0

मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन...

Read moreDetails
बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

September 23, 2026
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

September 23, 2026
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

September 23, 2026
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

September 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home