कळनुरी: खरवड येथे वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याच्या वतीने सर्कल व बूथ बांधणी संदर्भात वंचितचे ता.अध्यक्ष राजू कांबळे यांच्या अध्यक्षते खाली बैठक पार पडली.
यावेळी सर्कल, बूथ, आगामी होणाऱ्या निवडणुका तसेच महिलांचे प्रश्न, घरकुल, राशन, निराधार योजना व इतर शेतकरी बांधवांच्या अनेक समस्या गेली कित्तेक वर्षापासून सोडविण्यात आल्या नाहीत या प्रश्नांवर देखील चर्चा करण्यात आली.
आगामी काळात ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. कारण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच समस्त जाती,धर्मातले व या महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी गरिबांचे प्रश्न मार्गी लावण्याची ताकद वंचित बहुजन आघाडी मध्ये आहे आणि हे सर्व प्रश्न वंचितच्या माध्यमातून मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी कळमनूरी वंचितचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे,अरुण दांडेकर,अरविंद दांडेकर, गोपाल दांडेकर सचिन दांडेकर,आशिष डोंगरे,अविनाश दांडेकर,संतोष कांबळे, महेंद्र पाटील, राहुल पाईकराव, शेषनारायण खंदारे, बाबाराव खडसे, अभिजीत भोकरे, अनिल डोंगरे, प्रदीप दांडेकर व इतर समस्त कार्यकर्ते महिला मंडळ उपस्थित होते.