Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे सफाई कामगाराचा मृत्यू; १ कोटींच्या मदतीसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

mosami kewat by mosami kewat
February 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे सफाई कामगाराचा मृत्यू; १ कोटींच्या मदतीसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे सफाई कामगाराचा मृत्यू; १ कोटींच्या मदतीसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

औरंगाबाद : महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत असताना एका सफाई कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिल दिनकर जाधव असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग काढताना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात असून, प्रशासकीय हलगर्जीपणावर बोट ठेवले जात आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनधिकृत बॅनर काढण्याचे आदेश दिले होते. (Aurangabad News)

या मोहिमेदरम्यान अनिल जाधव हे बॅनर काढण्यासाठी गेले असता, त्यांचा जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाला. बॅनर काढताना विद्युत विभाग किंवा महावितरणच्या (MSEB) कर्मचाऱ्यांना सोबत घेणे अनिवार्य होते, मात्र तसे न केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेसाठी पूर्णपणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे. (Aurangabad News)

दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आणि मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला महापालिकेकडून १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

यावेळी प्रशासनाकडे मागणी करताना वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, नगरसेविका करुणा मेघानंद जाधव, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, पश्चिम शहर उपाध्यक्ष मेघानंद जाधव, युवा आघाडी मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Aurangabad News)

Tags: aurangabadMunicipal Negligence ClaimsSanitation Worker i
Previous Post

औंढा नागनाथ तहसील कार्यालयात रेशन कार्ड घोटाळा उघड; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Next Post

ऊर्जा ते संरक्षण: भारतावर परकीय दबावाचे सावट

Next Post
ऊर्जा ते संरक्षण: भारतावर परकीय दबावाचे सावट

ऊर्जा ते संरक्षण: भारतावर परकीय दबावाचे सावट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home