Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

खोटे बोलत नसाल तर २४ तासांत १५ जागा घोषित करा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 13, 2024
in राजकीय
0
खोटे बोलत नसाल तर २४ तासांत १५ जागा घोषित करा
       

संजय राऊत यांना वंचितने केले आवाहन !

मुंबई : संजय राऊत यांनी काय खोटे बोललो हे स्पष्ट करा, असे म्हटल्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना एक्स हॅंडलवरुन पोस्ट करत आवाहन केले आहे. सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, जर तुम्ही खोटे बोलत नसाल तर येत्या २४ तासांत या १५ जागा घोषित करा. जर तुम्ही त्या १५ जागा २४ तासांत घोषित करु शकला नाही तर तुम्ही माध्यमांना दिलेली माहिती खोटी आणि अर्धवट होती हे सिद्ध होते असेही म्हटले आहे.

सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे की, संजय राऊत यांनी माध्यमांसमोर एक वक्तव्य केलं आहे. त्यात ते म्हणताहेत की, ते खोटे बोलत नाहीत. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात माध्यमांना माहिती देताना केवळ वंचित बहुजन आघाडीमुळे हे जागावाटप रखडलेय की काय अशी माहिती दिली जाते. मात्र, प्रत्यक्षात १५ जांगावर या तिन्ही पक्षात समझोता झालेला नाही. या १५ जागा अद्याप अनसेटल आहेत. त्यापैकी १० जांगावर काँग्रेस आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. तर ५ जागांवर शिवसेना, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. अशा १५ जागांचं वाटप अद्याप आपण करु शकला नाही. पण, याबाबतीत एकही शब्द काढला जात नाही.

मोकळे यांनी म्हटले आहे की, माध्यमांशी बोलताना वंचितमुळेच जागा वाटप रखडले असल्याचे चित्र तयार केले जात असून, याचं खापर वंचितच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे तो थांबला पाहिजे. जर तुम्ही खोटे बोलत नसाल, तर येत्या २४ तासांत या १५ जागा घोषित करा. जर तुम्ही त्या १५ जागा २४ तासांत घोषित करु शकला नाही तर तुम्ही माध्यमांना दिलेली माहिती खोटी आणि अर्धवट होती हे सिद्ध होते. तसेच, आपण 15 जागांचा वाद मिटवावा अशी सुरुवातीपासून वंचितची भूमिका राहिली आहे, त्याबाबतीत आम्ही बोलत आलो आहोत. मात्र, माध्यमांचा वापर करुन आम्हालाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. तो थांबवण्यात यावा असे आम्ही आवाहन करतो, असेही मोकळे यांनी म्हटले आहे.


       
Tags: CongressmahavikasaghadiNCPPrakash Ambedkarsanjay rautShivsenaSiddharth MokleVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पांढरीतील प्रवेशद्वाराचा वाद चिघळला

Next Post

परळीत ‘वंचित’ च्या युवा आघाडीतर्फे ‘प्रबुद्ध भारत’ सभासद नोंदणी अभियान सुरू.

Next Post
परळीत ‘वंचित’ च्या युवा आघाडीतर्फे ‘प्रबुद्ध भारत’ सभासद नोंदणी अभियान सुरू.

परळीत 'वंचित' च्या युवा आघाडीतर्फे 'प्रबुद्ध भारत' सभासद नोंदणी अभियान सुरू.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोशल मीडियाच्या पलीकडचा संघर्ष: देशातील तरुण रस्त्यावर उतरतो तेव्हा…
बातमी

सोशल मीडियाच्या पलीकडचा संघर्ष: देशातील तरुण रस्त्यावर उतरतो तेव्हा…

by mosami kewat
July 21, 2026
0

- संजीव चांदोरकर  देशातील सर्व विद्यार्थी तरुणांचे अभिनंदन आणि आभार !  …..  देशातील शिक्षण क्षेत्राचा ज्वलंत विषय,  गेली अनेक वर्ष...

Read moreDetails
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

July 21, 2026
२२ बलिदाने जाऊनही सत्ताधारी अन् विरोधक गप्प का? NEET पेपरफुटीवरून अहिल्यानगरात ‘संघर्ष मार्च’चा जोरदार एल्गार!

२२ बलिदाने जाऊनही सत्ताधारी अन् विरोधक गप्प का? NEET पेपरफुटीवरून अहिल्यानगरात ‘संघर्ष मार्च’चा जोरदार एल्गार!

July 21, 2026
आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी; नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यशस्वी स्थगित

आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी; नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यशस्वी स्थगित

July 21, 2026
SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home