Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

आपले अधिकार शाबूत ठेवण्याची ही लढाई

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 28, 2024
in राजकीय
0
आपले अधिकार शाबूत ठेवण्याची ही लढाई
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : पुण्यातील सत्ता परिवर्तन महासभेला उसळला जनसागर

पुणे : आगामी निवडणूक पक्षाची नाही, तर ती आपली स्वतःची आहे. इथे सत्तेवर कोणाला बसवायचे याची निवडणूक नाही, तर या ठिकाणी आपले अधिकार शाबूत ठेवण्याची ही लढाई असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. उद्याची व्यवस्था काय असेल, याची चुणूक या सरकारने दाखवली आहे, त्यामुळे आतापासून सावध राहा, असे आवाहनही त्यांनी केले.
एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता परिवर्तन महासभा झाली. या वेळी सभेसाठी विविध जाती धर्मातील लाखोंचा जनसागर उपस्थित होता.

मार्च महिन्यांत निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. आपल्या समोरचं लक्ष कायम ठेवलं पाहिजे ते म्हणजे, पुन्हा आरएसएस – भाजपचे सरकार केंद्रात सत्तेत येणार नाही ही दक्षता आपण घेतली पाहिजे, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.

आंबेडकर म्हणाले, उद्या युती होईल न होईल सांगता येत नाही. व्हायला पाहिजे अशी आपली इच्छा आहे. पण आपल्या इच्छेचं काय करणार ? कारण, मोदी हा रिंगमास्टर बसलेला आहे. त्या रिंगमास्टरने जेलमध्ये जावं लागेल म्हटलं, तर हा म्हणतो मी तुझ्याच जेलमध्ये येतो कशाला जेलमध्ये घालवतो अशा घटना होतील. काहीही झालं तरी आपले गणित पक्कं करून घ्यायचं ते म्हणजे फुले – शाहू – आंबेडकरी विचारांच्या एका मतदाराने आपल्या बरोबर पाच मतदार जोडले पाहिजे.

बाबासाहेबांनी वेठबिगारी पद्धत बंद केली. सरकारी कर्मचाऱ्याला चुका केल्याशिवाय काढता येणार नाही. जोपर्यंत त्याचे वय होत नाही. त्याला शाश्वत केले. आता त्याला अस्थिर केले जात आहे. शासनाच्या मर्जीवर जगावं लागणार आहे, अशी परिस्थिती आहे.  पूर्वी राजेशाही होती. राजेशाहीच्या मर्जीप्रमाणे जगावं लागतं होते, आता राजेशाही संपली संविधान आले आणि आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे जगू लागलो. आज हीच मर्जी बंदिस्त केली जाणार आहे.ती वेगवेगळ्या प्रकारे बंदिस्त केली जाईल, NRC मार्फत बंद केली जाईल किंवा कागदावरच आरक्षण ठेवलं जाईल असेही ते म्हणाले.

ओबीसी आणि मराठ्यांचे आरक्षणाचे ताट वेगळे हवे

सायमन कमिशनचा रिपोर्ट जो बाबासाहेबांनी दिला. त्यात ते म्हणाले होते की, ज्या जातींचा उल्लेख केला होता त्यात त्यांनी गरीब मराठ्यांचा देखील उल्लेख केला होता.आरक्षणाचा प्रश्न शांततेत सोडवता आला असता. पण ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद लावला आहे. वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की, ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे आणि मराठा समाजाचे ताट वेगळे असले पाहिजे. ही भूमिका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सत्ता परिवर्तन महासभेतून स्पष्ट केली.

जरांगेंनी निवडणूक लढवावी

जरांगे पाटील यांना प्रेमाचा सल्ला आहे की, आम्ही अण्णा पाटलांचे आंदोलन पाहिलं आहे. त्यांचे आंदोलन जिरवण्यात आले. आता उभे केलेले आंदोलन जिरवायचे नसेल, तर तुम्हाला निवडणुकीत उभे राहिल्याशिवाय पर्याय नाही. निवडणुकीत उभे राहिला नाहीत, तर इथला निजामी मराठा तुम्हाला कधी संपवेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही.कारण, गरिबांच्या चळवळी कधीच उभ्या राहू दिल्या नाहीत. आपण गरिबांच्या आणि उपेक्षितांच्या चळवळी उभ्या करत आहोत या चळवळीमध्ये एकजूट होणे महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुस्लिमांनी वंचितांच्या आंदोलनात सहभागी व्हावे

मुस्लीम समाज स्वतःची सुरक्षितता राजकीय पक्षांत शोधतो. त्यांना सांगतो की, राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षा देणार नाहीत. तुम्ही या वंचितांच्या सभेत आणि आंदोलनात सहभागी झाला, तर तिथेच त्याला सुरक्षितता मिळेल हे लक्षात घेतलं पाहिजे असे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश शेंडगे, टी. पी. मुंडे यांची उपस्थिती

दरम्यान, सत्ता परिवर्तन महासभेला ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे आणि टी. पी. मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारण एका नव्या वळणावर जाणार असल्याने या सभेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे अलुतेदर, बलुतेदार समाज घटकांबरोबर विविध जाती धर्माचे लोक या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

144 क्राउड फंडींग मोहिमेला प्रतिसाद

सत्ता परिवर्तन महासभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल या जनमदिनाची संकल्पना घेवून 144 क्राउड फंडींग मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या वेळी प्रवीण रणबागुल यांनी 144000 रुपयांचा धनादेश ॲड. आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केला. सभेत प्रत्येक खुर्चीमागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरवर क्यूआर कोड देण्यात आला होता. त्याद्वारे अनेकांनी स्वयंस्फूर्तीने वंचित बहुजन आघाडीला मदत केली.


       
Tags: MarathaobcPrakash AmbedkarpuneSatta Parivartan MahasabhaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

प्रवीण रणबागुल यांनी दिला 144000 रुपयांचा चेक

Next Post

वंचित’ने ‘मविआ’ ला जागांची यादी सादर केली

Next Post
वंचित’ने ‘मविआ’ ला जागांची यादी सादर केली

वंचित'ने 'मविआ' ला जागांची यादी सादर केली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लंडनमध्ये द्वेषाला स्थान नाही; अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही मोहन भागवतच्या दौऱ्याला विरोध; RSS वर बंदी घालण्याची मागणी
बातमी

लंडनमध्ये द्वेषाला स्थान नाही; अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही मोहन भागवतच्या दौऱ्याला विरोध; RSS वर बंदी घालण्याची मागणी

by mosami kewat
September 4, 2026
0

लंडन : अमेरिकेच्या दौऱ्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून, लंडनमधील त्यांच्या प्रस्तावित कार्यक्रमाला विविध...

Read moreDetails
नवी मुंबई: रबाळेतील साईबाबा नगरच्या समस्यांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सहाय्यक आयुक्तांनी केली पाहणी

नवी मुंबई: रबाळेतील साईबाबा नगरच्या समस्यांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सहाय्यक आयुक्तांनी केली पाहणी

September 4, 2026
गणेशोत्सव आणि पर्यावरणाची जपवणूक : अकोल्यात २० हजार चिमुकल्यांनी साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती! 

गणेशोत्सव आणि पर्यावरणाची जपवणूक : अकोल्यात २० हजार चिमुकल्यांनी साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती! 

September 4, 2026
NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सवलत कार्डची अट तात्काळ रद्द करण्याची मागणी

NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सवलत कार्डची अट तात्काळ रद्द करण्याची मागणी

September 4, 2026
रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय बैठक; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण

रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय बैठक; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण

September 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home