Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
July 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
       
मालेगाव : राज्यात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेत अनेक गंभीर त्रुटी असल्याचे सांगण्यात आले.  तसेच या संदर्भात आज सोमवारी (दि. २०) वंचित बहुजन आघाडीचे नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष दिपक उत्तमराव पवार यांनी मालेगावच्या तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याबरोबरच BLO यांच्या कामकाजातील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडून स्वच्छ आणि पारदर्शक निवडणुकीच्या उद्देशाने SIR कार्यक्रम राबविण्यात येत असला, तरी मतदारांमध्ये आवश्यक जनजागृती करण्यात आलेली नाही. तसेच अनेक BLO घरोघरी जाऊन पडताळणी करण्याऐवजी मतदारांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बोलावत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्याच्या घडीला ५० टक्क्यांहून अधिक मतदारांचे मॅपिंग अद्याप पूर्ण झालेले नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. सन २००२ पासून मतदार यादीत नाव असलेल्या अनेक मतदारांचेही मॅपिंग झाले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, मोठ्या प्रमाणावर अशिक्षित मतदार असल्याने आणि आवश्यक कागदपत्रांच्या जाचक अटींमुळे अल्पावधीत प्रक्रिया पूर्ण करणे अनेकांसाठी शक्य नसल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.

या त्रुटींमुळे पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता असून, नागरिकांना त्यांच्या मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहावे लागू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

तहसील प्रशासनाने संबंधित BLO यांना प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन पडताळणी करण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात, कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्यावी आणि पात्र मतदारांची नावे कमी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित BLO तसेच प्रशासनावर राहील, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. SIR कार्यक्रमाची व्याप्ती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी तसेच कार्यक्रमातील सर्व गंभीर त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इतर नागरिक उपस्थिती होते. 

Tags: MaharashtraMalegaoPoliticalSirSIR ProcessVanchit Bahujan Aaghadivote
Previous Post

अखेर पीपल्स एज्युकेशन सोसायटीला न्याय मिळाला ; धर्मादाय आयुक्तांचा ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने निकाल 

Next Post

आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी; नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यशस्वी स्थगित

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन
बातमी

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

by mosami kewat
August 30, 2026
0

जालना : परमेश्वर हिवाळे यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षेच्या नावाखाली २३ मे २०२६ रोजी कैन्हानगर, जालना येथे अमानुषपणे शेण चारून,...

Read moreDetails
शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

August 30, 2026
धोरणात्मक दिवाळखोरी!

धोरणात्मक दिवाळखोरी!

August 30, 2026
प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!

प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!

August 30, 2026
झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

August 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home