Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विद्यार्थ्यांचे परिक्षा फार्म स्विकारण्यास महाविद्यालयाचा नकार !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 21, 2024
in बातमी
0
विद्यार्थ्यांचे परिक्षा फार्म स्विकारण्यास महाविद्यालयाचा नकार !
       

वर्धा : डोंगरगाव वर्धा रोड येथील वैनगंगा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनातर्फे मिळणाऱ्या एकूण विद्यावेतनाच्या ६०% रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामधे थेट जमा होण्याअगोदरच महाविद्यालयामध्ये फी जमा करा अन्यथा परिक्षेचा अर्ज भरू देणार नाही असा तुगलकी फरमानच महाविद्यालयाने काढला. सदर प्रकाराची तक्रार प्राप्त होताच वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी आज महाविद्यालयामधे जावून आक्रमकपणे विद्यार्थ्यांची बाजू मांडली. त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यांचे परिक्षेचे अर्ज थांबवले जाणार नाही, येत्या मंगळवारला सर्व अर्ज जमा केले जातील असे आश्वासन महाविद्यालयातर्फे देण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळानी दिनांक १७ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाला भेट दिली. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात केंद्र, राज्य सरकार व विद्यापीठाच्या नियमांचे पालन करावे अन्यथा एट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आंदोलनात्मक भुमिका घेवू अशी भूमिका यावेळी वंचित बहुजन आघाडीने घेतली.

शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ७ दिवसांचे आत महाविद्यालयाची फी भरण्याचा नियम आहे, परंतु शिष्यवृत्ती प्राप्त होण्याच्या अगोदरच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खिशातून महाविद्यालयाची फी भरावी असे महाविद्यालयातर्फे सांगितले गेले, तेव्हापर्यंत विद्यापीठाच्या परिक्षेचे अर्जच भरण्यास विद्यार्थ्यांना मज्जाव करण्यात आला, हे राज्य तथा केंद्र शासनाच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन असून, यासमोर असे प्रकार घडले तर संबंधीत महाविद्यालयाविरोधात एट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल असे वंचित चे आय टी सेल प्रमुख सिध्दांत पाटील यांनी सांगितले.

महाविद्यालयातील अधिकाऱ्यांसोबत चर्चेअंती सर्व विद्यार्थ्यांचे परिक्षा अर्ज स्विकारले जातील असे आश्वासन महाविद्यालयातर्फे देण्यात आले.


यावेळी, वंचित चे सिध्दांत पाटील, मनिष बोरकर, धम्मदीप लोखंडे, यश कुंभारे, अनिकेत कुत्तरमारे, आनंद मेश्राम, अमोल हाडके, शुभम कांबळे, आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.


       
Tags: StudentsVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadiwardha
Previous Post

सत्ता परिवर्तन महासभेला लाखोंच्या संख्येने राहा उपस्थित

Next Post

छ. शिवरायांना अभिवादन करून ‘वंचित’ चे भव्य शाखा उद्घाटन !

Next Post
छ. शिवरायांना अभिवादन करून ‘वंचित’ चे भव्य शाखा उद्घाटन !

छ. शिवरायांना अभिवादन करून 'वंचित' चे भव्य शाखा उद्घाटन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मोदींचे परराष्ट्र धोरण: प्रतिमा विरुद्ध वास्तव
article

मोदींचे परराष्ट्र धोरण: प्रतिमा विरुद्ध वास्तव

by Akash Shelar
August 8, 2025
0

लेखक : आज्ञा भारतीय २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर विराजमान झाले, तेव्हा देशाच्या राजकीय वातावरणात एक उत्साही लाट पसरली...

Read moreDetails
Maharashtra Assembly Elections 2024 : 76 लाख मते कशी वाढली शोधण्यासाठी सोबत या! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेसला आवाहन

Maharashtra Assembly Elections 2024 : 76 लाख मते कशी वाढली शोधण्यासाठी सोबत या! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेसला आवाहन

August 8, 2025
यशोदा नगर रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

यशोदा नगर रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

August 8, 2025
‎विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत - ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका

‎विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत – ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका

August 7, 2025
ॲड. प्रकाश आंबेडकर पंढरपूर कोर्टात हजर, वकिलांशी साधला संवाद

ॲड. प्रकाश आंबेडकर पंढरपूर कोर्टात हजर, वकिलांशी साधला संवाद

August 7, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home